यवत : यवत पोलीस ठाणे हद्दीतील खामगाव येथे अज्ञात व्यक्तीने दोघावर धारदार शस्त्राने हल्ला केला, यामध्ये एकाचा गळा चिरून खून तर दुसऱ्याला जखमी करण्याची घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. याप्रकरणी एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत गळा छटून खून झालेल्या मयत व्यक्तीचे नाव मुकेश उर्फ मुक्तार यादव( वय ४५, मूळ रा, धरमपूर जि, गझिपुर, उत्तर प्रदेश)असे आहे, तर रामकूवर यादव (वय ४४ मूळ रा, डिग्गी, जि, चँदोली, उत्तर प्रदेश) हा गंभीर जखमी झाला आहे.
खामगाव येथील शेतकरी कुणाल सदाशिव कवडे यांचा दुग्ध व्यवसाय आहे. त्यांचे गोठ्यावर वरील दोन्ही परप्रांतीय मजूर काम करतात. शुक्रवार दि, ३१ रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने हा भयानक प्रकार केला आहे. याबाबत शेतकरी कुणाल कवडे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये पिंटू अशोक गायकवाड याचे संशयित आरोपी म्हणून नाव दिले आहे. त्याच्यावर खून व खुनाचा प्रयत्न करणे यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गायकवाड हा फरार झाला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.