Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रायगडच्या शेतकऱ्यास ‘वालीच’ नाही! नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी हतबल

कोजागिरीनंतर झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तालुका कृषी कार्यालयात पंचनाम्यांचे ढीग साचले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 02, 2026 | 02:51 PM
कडक उन्हामुळे उत्पादन घटले; जुन्नरमधील शेतकरी चिंतेत, पेरणीही वाढली मात्र...

कडक उन्हामुळे उत्पादन घटले; जुन्नरमधील शेतकरी चिंतेत, पेरणीही वाढली मात्र...

Follow Us
Follow Us:
  • रायगडच्या शेतकऱ्याला वालीच नाही
  • गतवर्षीच्या तुलनेत अनेक शेतकऱ्यांच्या पदरात ५० टक्केही धान्य पडले नाही
  • सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाताची परिपक्व कणसे शेतातच आडवी पडली
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटातून जात असल्याचे चित्र आहे. निसर्गाचा लहरीपणा, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव, मजुरांची कमतरता, वाढती मजुरी, महागडी कीटकनाशके तसेच शासनाचे दुर्लक्ष या कारणांमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे ‘रायगडच्या शेतकऱ्याला वालीच नाही’ अशी भावना शेतकरीवर्गात व्यक्त होत आहे.

पावसाचे आगमन नेहमीपेक्षा लवकर मे महिन्यातच झाले. अतिवृष्टी, वादळी वारे आणि काही भागांत पूरस्थिती निर्माण होऊनही सुरुवातीला भात पिकाची वाढ समाधानकारक झाली. त्यामुळे शेतकरी आनंदित होता. भरघोस उत्पादनाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी गौरी-गणपती तसेच नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला. शेतात भरगच्च कणसे पाहून वर्षभराच्या खर्चाचे नियोजन शेतकरी करू लागला होता.

US-Israel Iran War: उरणचे दाम्पत्य अ‍ॅनिव्हर्सरीला गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद

शेतकऱ्यांच्या पदरात ५० टक्केही धान्य पडले नाही…

लाणी-बांधणीच्या हंगामात मजुरांची टंचाई आणि अव्वाच्या सव्वा मजुरी यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिके कापण्याचाही निर्णय घेतला नाही. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत अनेक शेतकऱ्यांच्या पदरात ५० टक्केही धान्य पडले नाही. भिजक्या भाताची स्थिती इतकी वाईट होती की धान्य खरेदी केंद्रांवरही त्याची खरेदी करण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.

नुकसान भरपाईच्या मदतीची प्रतीक्षा

कोजागिरीनंतर झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतक-यांनी व्यक्त केली होती. महसूल विभागाकडून, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून पंचनामे करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतीचे फोटो घेऊन ग्रामपंचायतमार्फत कृषी विभागाकडे अहवाल पाठविण्यात आले. तालुका कृषी कार्यालयात पंचनाम्यांचे ढीग साचले; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसल्याची खत व्यक्त होत आहे. नुकसान भरपाईच्या आशेने शेतकरी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे वास्तव आहे.

कणसातील भात काळवंडून निकृष्ट झाले

मात्र कोजागिरी पौर्णिमेच्या सुमारास सतत पडलेल्या पावसाने सर्व आशा धुळीस मिळाल्या. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भाताची परिपक्व कणसे शेतातच आडवी पडली. शेतात पाणी साचल्याने पेंढा कुजला आणि कणसातील भात काळवंडून निकृष्ट झाला. काही ठिकाणी तर भाताला कोंब फुटल्याचेही दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे नुकसान झाले.

आंबा बागांनाही बसला फटका

शेतीतील तोटा भरून काढण्यासाठी रायगडमधील अनेक शेतकरी फलोत्पादनाकडे वळले असून आंबा लागवडीला प्राधान्य देत आहेत. चांगली निगा राखल्यामुळे आंबा झाडांना भरपूर मोहोर येतो. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून हा मोहोर काही दिवसांत करपत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करून तीन-चार वेळा फवारणी करत असले तरी फळधारणा होत नाही. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च वाया जात आहे.

मुंबई महापालिका बजेटमधील ‘आरोग्य डिजिटल क्रांती’वर प्रश्नचिन्ह! जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा?

अद्याप शिबिराचे आयोजन नाही

या समस्येवर शास्त्रीय कारणे शोधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त होत आहे, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वाघोली (ता. अलिबाग) येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. त्या वेळी लवकरच शिबिर आयोजित केले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र वर्ष उलटून गेले तरी अद्याप शिबिराचे आयोजन झालेले नाही, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Raigad news farmers left helpless amid natural disasters and administrative negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Alibag
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Horror Story : काळ्या बाहुलीला लाथ मारणं पडलं महागात! ‘तो’ कधीच परतला नाही; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेला थरार
1

Horror Story : काळ्या बाहुलीला लाथ मारणं पडलं महागात! ‘तो’ कधीच परतला नाही; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेला थरार

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या
2

Rain Alert: या जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; आज (२ जुलै) शाळांना सुट्टी जाहीर, तुमच्या भागातील शाळा बंद राहणार का? जाणून घ्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
3

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
4

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.