पंतप्रधान मोदींनी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहे (फोटो - सोशल मीडिया)
देशभर शिवभक्तीची लाट पसरली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. आदिपुरुष महादेवाच्या उपासनेचा भव्य उत्सव महाशिवरात्री आज संपूर्ण भारतात अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने साजरा केला जात आहे. या शुभ प्रसंगी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नेत्यांनी केवळ वैयक्तिक सुख आणि शांतीसाठीच नव्हे तर भारताच्या अभिमानासाठी आणि जागतिक समृद्धीसाठी महादेवाला प्रार्थना केली आहे.
हे देखील वाचा : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे ट्विट
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘एक्स’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. यामध्ये द्रौपदी मुर्मू यांनी लिहिले आहे की, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, मी माझ्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. महादेवाचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावेत आणि आपला देश प्रगती करत राहावा अशी मी प्रार्थना करते, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिले आहे. त्याचबरोबर उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देखील एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, भक्ती, शक्ती आणि भगवान शिव यांना समर्पित असलेल्या पवित्र सण महाशिवरात्रीच्या आपल्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. काशीपासून रामेश्वरमपर्यंत, महाशिवरात्रीचा हा पवित्र सण भारताच्या अखंड आणि शाश्वत आध्यात्मिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. महादेव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य देतील – हीच आमची शुभेच्छा, असे सी पी राधाकृष्णन यांनी लिहिले आहे.
महाशिवरात्रि के पावन अवसर पर मैं सभी देशवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देती हूं। मेरी प्रार्थना है कि महादेव की कृपा हम सभी पर सदा बनी रहे और हमारा देश प्रगति के पथ पर सदैव अग्रसर रहे। — President of India (@rashtrapatibhvn) February 15, 2026
ज्यात लिहिले आहे की महादेवाचे आशीर्वाद सर्व देशवासियांवर राहोत. भगवान शिवाच्या आशीर्वादाने आपला देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहो अशी त्यांनी प्रार्थना केली.
हे देखील वाचा : तो दावा निव्वळ मूर्खपणा’…; एपस्टीन प्रकरणावरून कपिल सिब्बल यांचा भाजपवर पलटवार
“भारत समृद्धीच्या शिखरावर पोहोचो – PM मोदींची प्रार्थना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वरील पोस्टद्वारे महाशिवरात्रीच्या आपल्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी भगवान शिव यांना सर्वांना नेहमीच आशीर्वाद देण्याची प्रार्थना केली. विशेषतः राष्ट्राच्या कल्याणाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी अशी आशा व्यक्त केली की त्यांच्या आशीर्वादाने सर्वांची भरभराट होईल आणि भारत समृद्धीच्या शिखरावर पोहोचेल. हा संदेश राष्ट्रनिर्माण आणि सार्वजनिक कल्याणासाठी पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचे स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरात्रीच्या निमित्ताने खास पूजा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरामध्ये रुद्राभिषेक केला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वन्दे वन्दनतुष्टमानसमतिप्रेमप्रियं प्रेमदं
पूर्णं पूर्णकरं प्रपूर्णनिखिलैश्वर्यैकवासं शिवम्।
सत्यं सत्यमयं त्रिसत्यविभवं सत्यप्रियं सत्यदं
विष्णुब्रह्मनुतं स्वकीयकृपयोपात्ताकृतिं शंकरम्॥ संयम, साधना और शिवत्व की कल्याणकारी चेतना से आलोकित महाशिवरात्रि के पावन अवसर पर आज… pic.twitter.com/EXsAxSvamn — Yogi Adityanath (@myogiadityanath) February 15, 2026






