मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता 'या' नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली...
मुंबई : मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. असे असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आंदोलनासाठी पूर्वतयारी चालवली आहे. त्यात आता येत्या 28 ऑक्टोबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.
सध्या मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी हा आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारसाठी ही नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, शेतमजूर कल्याण महामंडळाची स्थापना, सर्व कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त करणे, गाव एकक धरून शेतकरी हिताची पीक विमा योजना, खते- बियाणांच्या तपासणीसाठी जात, धर्म, पंथ आणि राजकीय गुलामी यामुळेच शेतकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण होत नाही. या स्थितीचा गैरफायदा व्यवस्था आणि सरकार घेते. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला ही परिस्थिती जबाबदार असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.
राज्यभरात करणार सभांचे आयोजन
संपूर्ण राज्यात सभांचे आयोजन करण्यात आले असून, बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला शेतकरी नेते विजय जावंधिया, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, विजय कुंभार, काशिनाथ जाधव इत्यादी नेत्यांनी बळ दिले आहे.
समिती करण्यात आली स्थापन
गावपातळीवर प्रयोगशाळा स्थापन करणे, इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. त्यासाठी शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.