
उपोषणावर शेकडो तरुण ठाम, रस्ता डांबरीकरणासाठी तहसीलदारांना निवेदन
Ahilyanagar News: चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट घरावर आदळला, मोठी जीवितहानी टळली
वारी येथील प्रभाग क्रमांक ५ मधील वारी-हिंगोणी रस्ता हा शेतकरी, दूध उत्पादक, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी गावात ये-जा करण्याचा प्रमुख मार्ग आहे. मात्र सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून उघडी खडी सर्वत्र पसरलेली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. विशेष म्हणजे सन १९७२ साली या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते; त्यानंतर आजतागायत रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींना कायमस्वरूपी इजाही झाली आहे. लहान शालेय विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता विशेषतः धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय होऊन नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीतही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ आश्वासनांचीच पूर्तता होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे…”; दावोसमधून काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी युवकांनी केली आहे. लेखी आदेश मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आजही मूलभूत रस्त्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याची बाब चिंताजनक आहे. वारी-हिंगोणी रस्त्याचा प्रश्न हा केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून ग्रामीण जीवनमान, सुरक्षितता आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेची कसोटी पाहणारा ठरत आहे.