Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाडा तालुक्यात प्राथमिक शिक्षण व्यवस्थेची परवड, जिल्हापरिषद शाळांमध्ये अनेक महत्वाची पदे रिक्त

पालघरमधील मोखाडा तालुक्यात शिक्षण व्यवस्था धाब्यावर बसवण्यात आली आहे. येथील जिल्हापरिषद शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांची ओढाताण होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 29, 2024 | 08:54 PM
मोखाडा तालुक्यात प्राथमिक शिक्षण व्यवस्थेची परवड, जिल्हापरिषद शाळांमध्ये अनेक महत्वाची पदे रिक्त

मोखाडा तालुक्यात प्राथमिक शिक्षण व्यवस्थेची परवड, जिल्हापरिषद शाळांमध्ये अनेक महत्वाची पदे रिक्त

Follow Us
Follow Us:

दीपक गायकवाड /मोखाडा: मोखाडा तालूक्यातील 154 जिल्हापरिषद शाळेमधून मुख्याध्यापकांच्या 6 रिक्त पदांसह 15 शिक्षक कमी आहेत. त्यातच 13 केंद्रप्रमुखांपैकी 11 केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्यामूळे या 11 केंद्रांचा कार्यभार पदवीधर शिक्षकांना सोपवला आहे. आधीच रिक्त असलेल्या 68 पदवीधर शिक्षकांच्या रिक्त पदात त्यामुळे वाढ झाली असल्याने शिक्षण व्यवस्थेवर आणखी ताण वाढलेला आहे.त्यामूळे मोखाडा तालूक्याची शिक्षण व्यवस्थेची परवड झाली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड होत असल्याने तातडीने अतिरिक्त शिक्षकांची तजविज करण्याची मागणी तालूक्यातील पालकांकडून केली जात आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘ही” प्रसिद्ध पर्यटन स्थळे होणार विकसित, केंद्राकडून ३,२९५ कोटींच्या ४० प्रकल्पांना मंजुरी

केवढी पदे रिकामी आहेत?

मोखाडा तालूक्यात 13 केंद्र शाळा असून 36 शाळा 8 वी पर्यंत, तर 115 शाळा ह्या इयत्ता 5 वी पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा आहेत. मात्र अपुऱ्या शिक्षकांमूळे स्थानिक प्रशासनाला अनेकदा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात सद्यस्थितीत 19 मंजूर मुख्याध्यापकांपैकी 13 मुख्याध्यापक कार्यरत असून 6 पदे रिक्त आहेत . पदवीधर 103 शिक्षकांपैकी 25 मुळ व 10 असे एकूण 35 शिक्षक कार्यरत असून 68 पदे रिक्त आहेत व सहाय्यक शिक्षकांची 337 पदे मंजूर असून त्यात मुळ 307 व पेसा अंतर्गत 15 असे एकूण 322 शिक्षक कार्यरत आहेत, ज्यात 15 उपशिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यातच शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या मंजूर 5 पदापैकी 1 कार्यरत असून तब्बल 4 शिक्षण विस्तार अधिकारी पदे रिक्त आहेत.

शिक्षण विस्तार अधिकारी यांचे सह थेट सहशिक्षक असे एकूण 104 अधिकारी व शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालूक्यातील प्राथमिक शिक्षणव्यवस्था सांभाळायची कशी ? हा महत्वाचा प्रश्न स्थानिक प्रशासनाला भेडसावत आहे.

७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर

दरम्यान इतका मोठा रिक्त पदांचा आकडा असताना त्यात वारंवार होणा-या लक्षणीय फुगवट्याची जाणीव असतांनाही वरिष्ठ पातळीवरून जुजबी उपाययोजने व्यतिरिक्त कार्यवाही होत नसल्याने शिक्षण विभागाला सध्या तरी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायाने अनेक ठिकाणी शाळांना टाळे ठोकणे , उपोषणासारखे प्रकार निस्तरावे लागत आहेत.

तब्बल 12 वर्षे इंग्रजीला शिक्षक नाही

कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय साखरी या मुलींच्या शाळेत तब्बल 12 वर्षांपासून इंग्रजी विषयाला शिक्षकच नाही. पाठ्यक्रम शिकवून इतर विषयांच्या शिक्षकांना इंग्रजी विषय शिकवावा लागत आहे‌.आधिच अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना इंग्रजी विषयाचा अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याने शिक्षकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर मुळ विषयांचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दुरगामी परिणाम होत आहे.

गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) यांचे म्हणणे काय?

वसंत महाले जे गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) आहेत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणतात की तालुक्यातील रिक्त पदांसाठी सेवानिवृत्त व कंत्राटी पध्दतीने पदभरती साठी अर्ज मागवले होते. परंतु, रिक्त पद भरतीची कार्यवाही जिल्हास्तरावर होत असते.

Web Title: Bad situation of primary education system in mokhada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 08:53 PM

Topics:  

  • Education System In India
  • maharashtra news
  • Palghar news

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर
2

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
3

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात
4

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.