Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलापूर प्रकरणावरुन राजकारण तापलं! आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट म्हणत बावनकुळेंचा टोला

बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे वातावरण गरम आहे. त्यामध्येच आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे या प्रकरणावरुन राजकारण रंगले असल्याचे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीने बंदची हाक दिल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 22, 2024 | 05:01 PM
BJP Chandrashekhar Bawankule on target Pakistan over Pahalgam terror attack

BJP Chandrashekhar Bawankule on target Pakistan over Pahalgam terror attack

Follow Us
Close
Follow Us:

मुंंबई : बदलापूरमध्ये लहान चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे वातावरण तापले आहे. शाळेमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्यामुळे पालकांनी आवाज उठवला आहे. बदलापूरमध्ये मोठे आंदोलन झाल्यानंतर आता या प्रकरणावरुन राजकारण रंगले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असून राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर वचक नसल्याचे देखील म्हटले जात आहे. विरोधकांनी टीकांची झोड उठवली असून आरोप केले जात आहे. बदलापूर अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद असा आक्रमक पवित्रा महाविकास आघाडीने घेतल्यामुळे महायुतीने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी महाविकास आघाडीची मानसिकता असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये  ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. बावनकुळे म्हणाले,”उद्धवजी कशाला दिशाभूल करता?, तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. घडले. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकत्ता, हाथरस, उनाव येथील घटनांवर तुम्ही बोलता. पण आश्चर्य आहे, तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसून नैतिकतेच्या गप्पा करता, बदलापूरच्या घटनेआडून राजकारण करता त्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात कित्ती भयंकर घडले होते. तेही कारनामे जरा आठवा, जनतेला ऐकवा. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात  महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा. जनतेला कळू द्या. आपले झाकून ठेवून कित्ती दिवस जनतेची  दिशाभूल करणार,” असा सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

उद्धवजी कशाला दिशाभूल करता? * तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. घडले! “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट,” अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकत्ता, हाथरस, उनाव येथील घटनांवर तुम्ही बोलता.
पण आश्चर्य आहे, तुम्ही…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 22, 2024

‘उठता बसता’ राजकारण करता

पुढे त्यांनी काही घटनांची आठवण करुन देत सांगितले की, “22 ऑगस्ट 2013 रोजी, म्हणजे 11 वर्षांपूर्वी,  आजच्याच दिवशी मुंबईतील शक्ती मिलमध्ये प्रेस फोटोग्राफर असलेल्या 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तेव्हा सरकार काँग्रेस -राष्ट्रवादीचे होते. हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकेला. पेट्रोल टाकून जाळले होते तेव्हा तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते आणि वसुली सम्राट गृहमंत्री होते. डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. 33 आरोपींची नावं समोर आली होती. तेव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते. मुंबईतील साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. येथील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता. तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते. या सर्वच घटनांचा आम्ही निषेध करतो, आरोपीना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुढाकार घेतो. पण तुम्ही ‘उठता बसता’ राजकारण करता. उद्धवजी, हे निषेधार्ह आहे. तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून आहे,” अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Web Title: Badlapur school case chandrashekhar bawankule slams uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 05:01 PM

Topics:  

  • Badlapur case
  • chandrashekhar bawankule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Khed Panchayat Samiti: खेड पंचायत समितीवर शिवसेना ठाकरे गटाचा भगवा; बाबाजी काळे यांची रणनीती यशस्वी
1

Khed Panchayat Samiti: खेड पंचायत समितीवर शिवसेना ठाकरे गटाचा भगवा; बाबाजी काळे यांची रणनीती यशस्वी

Gairan Lands PMC: राज्यातील ७,८८७ हेक्टर गायरान जमिनी आता सरकारच्या मालकीच्या  होणार
2

Gairan Lands PMC: राज्यातील ७,८८७ हेक्टर गायरान जमिनी आता सरकारच्या मालकीच्या होणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; आता ओडिशात…
3

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; आता ओडिशात…

Maharashtra Politics: ‘हा विकासाचा मृगजळ…”; उद्धव ठाकरेंची Budget 2026 वर सडकून टीका
4

Maharashtra Politics: ‘हा विकासाचा मृगजळ…”; उद्धव ठाकरेंची Budget 2026 वर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.