Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत सुनेत्रा पवार यांचे प्रचारप्रमुख म्हणून बाळासाहेब तावरे यांच्या नावाची घोषणा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2024 | 02:53 PM
बारामतीत सुनेत्रा पवार यांचे प्रचारप्रमुख म्हणून बाळासाहेब तावरे यांच्या नावाची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब तावरे यांची मंगळवारी भेट घेऊन, त्यांना तुम्ही माझ्यासह सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आहात, असे समजतो, असे म्हटले होते. त्यामुळे बाळासाहेब तावरे शरद पवार गटामध्ये सहभागी होतात काय, याबाबत चर्चेला उधाण आले होते. मात्र, बाळासाहेब तावरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुखाची नियुक्ती केली जाणार असून, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी बाळासाहेब तावरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी १८ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात भरला जाणार आहे. या अगोदर सकाळी साडेनऊ वाजता पुणे जिल्हा परिषदेजवळ पुना क्लबच्या समोर जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर, प्रदीप रावत, अनिल शिरोळे, संजय काकडे, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांच्यासह आमदार दत्तात्रय भरणे, भीमराव तापकीर, दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, राहुल कुल, सुनील शेळके, अतुल बेनके, सुनील टिंगरे, चेतन तुपे, माधुरी मिसाळ, अश्विनी जगताप, सिध्दार्थ शिरोळे, सुनील कांबळे, अण्णा बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती किरण गुजर यांनी दिली.

Web Title: Balasaheb taware is appointed as chief election campaigner of sunetra pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2024 | 02:47 PM

Topics:  

  • Baramati Lok Sabha
  • baramati news
  • Nationalist Congress Party
  • Pune

संबंधित बातम्या

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन
1

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
3

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

Mira Bhayandar Election : उमेदवारी अर्ज दाखल केला अन् काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू
4

Mira Bhayandar Election : उमेदवारी अर्ज दाखल केला अन् काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.