Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune GBS Update: पाणीपुरी खाल्ली अन् GBS ने गाठले; पुण्यात शिकणाऱ्या तरुणीची तीन आठवड्यांची झुंज अखेर अयशस्वी

पुण्यात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जीबीएस आजार मोठ्या प्रमरणात पसरत आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2025 | 07:04 PM
Pune GBS Update: पाणीपुरी खाल्ली अन् GBS ने गाठले; पुण्यात शिकणाऱ्या तरुणीची तीन आठवड्यांची झुंज अखेर अयशस्वी

Pune GBS Update: पाणीपुरी खाल्ली अन् GBS ने गाठले; पुण्यात शिकणाऱ्या तरुणीची तीन आठवड्यांची झुंज अखेर अयशस्वी

Follow Us
Close
Follow Us:

GBS Virus: पुण्यात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जीबीएस आजार मोठ्या प्रमरणात पसरत आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचे म्हटले जात आहे. राज्यात जीबीएसचे साधारण 150 ते 200 रूग्ण आढळून आले आहेत. नुकतीच बारामतीची असणारी आणि पुण्यात शिकणाऱ्या एका मुलीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे.

जीबीएस आजाराशी झुंज देणाऱ्या एका युवतीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थीनी पुण्यातील सिंहगड परिसरात राहत होती असे समजते आहे. शिकण्यासाठी ती बारामती येथून पुण्याला आल्याचे समोर आले आहे. बारामतीमधून एका युवतीचा जीबीएस आजारांमुळे मृत्यू झाला आहे. बारामतीची ही मुलगी शिक्षणासाठी आपल्या नातेवाईकांकडे पुण्यात राहायला होती.

या विद्यार्थिनीला जीबीएसची लागण झाली होती. तिच्या गेले तीन आठवडे उपचार सुरू होते. या मुलीस जुलाब आणि अशक्तपणा अशी लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे शंका आल्याचे तीने याबद्दल तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी तिला पुण्यात उपचारासाठी नेण्यास सांगितले. तिला तातडीने पुण्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर हा त्रास तिला जाणवू लागला होता. गेले तीन आठवडे तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर तिचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील ‘या’ विहीरीमुळे पसरला GBS व्हायरस

पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णसंख्या 111 वर पोहोचली असून, यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रुग्णांपैकी 80% रुग्ण नांदेड गाव आणि नांदेड सिटी परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील परिसरातील असल्याचे निदर्शनास आले आहे. या दूषित पाण्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या वाढत्या प्रकरणांमुळे लोक खूप घाबरले आहेत. दरम्यान, वाढत्या प्रकरणांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आणि कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, या आजाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, लोकांनी त्यांचे अन्न, विशेषतः चिकन, पूर्णपणे शिजवावे.

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की या आजाराबाबत कुक्कुटपालनाशी संबंधित चिंता दूर केल्या पाहिजेत आणि कोंबड्यांना मारण्याची गरज नाही. “अलीकडेच खडकवासला धरण परिसरात (पुणे) जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत,” असे ते म्हणाले. काही तज्ञांनी याचा संबंध पाण्याच्या दूषिततेशी जोडला, तर काहींनी हा आजार चिकन खाल्ल्याने झाल्याचे म्हटले. सखोल तपासणीनंतर, असा निष्कर्ष काढण्यात आला की कोंबड्यांना मारण्याची गरज नाही.”

हेही वाचा: GBS Case: महाराष्ट्रातील वाढत्या गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या केसवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चिकन खाणाऱ्यांसाठी सल्ला

जीबीएस कसा पसरतो?

जीबीएस संसर्ग दूषित पाणी आणि अन्नामुळे होऊ शकतो, विशेषतः ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ या जीवाणूंनी संक्रमित अन्नामुळे. आरोग्य तज्ञांच्या मते, हे बॅक्टेरिया कमी शिजवलेल्या चिकनमध्ये आढळू शकतात, ज्यामुळे हा संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते.

 

Web Title: Baramati girl studied in pune loss their life about gbs virus maharashtra health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • baramati
  • GBS virus
  • Health News
  • Pune

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
2

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
3

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
4

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.