Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: बारामती नगरपरिषदेला १ कोटींची अत्याधुनिक सीवर मशीन; ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ स्वच्छता व्यवस्थेत नवे पर्व

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सकारात्मक निर्णयामुळे बारामतीला ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी दिली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 03, 2026 | 09:49 AM
Baramati Municipal Council, Sunetra Pawar Baramati, Sewer Suction Jetting Machine

Baramati Municipal Council, Sunetra Pawar Baramati, Sewer Suction Jetting Machine

Follow Us
Follow Us:

Baramati News: बारामती शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन उपलब्ध झाले आहे. हे अत्याधुनिक वाहन बारामती नगरपरिषदेच्या प्रांगणात दाखल होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आगामी बारामती दौऱ्यात त्याचे लोकार्पण करून ते बारामतीकरांच्या सेवेत समर्पित करण्यात येणार आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीला ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली असून, दादांच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक बारामतीच्या संकल्पनेला त्यांनी पुढे नेण्याचे काम केले आहे.

RTI कायद्यातील बदलांना तूर्तास स्थगिती; मुख्यमंत्री म्हणाले, ‘अण्णांशी चर्चा होईपर्यंत नवे नियम…’

सुमारे १८ टन चेसिसवर उभारण्यात आलेल्या या वाहनाची किंमत १ कोटी असून या आधुनिक वाहनामध्ये ८,००० लिटर क्षमतेची टाकी असून त्यापैकी ४,००० लिटर गाळासाठी आणि ४,००० लिटर पाण्यासाठी राखीव आहे. त्यामुळे सीवर लाईनमधील गाळ काढणे, चेंबर साफ करणे, तुंबलेली गटारे मोकळी करणे तसेच पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा जलद उपसा करणे ही सर्व कामे अत्यंत कार्यक्षमतेने करता येणार आहेत.

ही मशीन राज्य शासनाच्या “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून मॅनहोल, भूमिगत गटारे, मलजल वाहिन्या, सेप्टिक टाक्या, सिव्हेज टाक्या तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने केली जाणार असून, स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून गटारात उतरावे लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला मोठे बळ मिळणार आहे.

बारामती शहरातील अनेक सीवर चेंबर्स १० ते १५ फूट खोल असल्यामुळे अनेक वेळा स्वच्छता कर्मचाऱ्यांना अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत होते. शहराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक मशीनची आवश्यकता ओळखत नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करून सातत्याने पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सकारात्मक निर्णयामुळे बारामतीला ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी दिली.

वाॅशिंग मशीनमध्ये टाकलं, स्प्रे मारला अन् बाथरुममध्येच… बंगळूरुतील डे-केअरमध्ये चिमुरड्यांसोबत धक्कादायक प्रकार

 

बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले की, “अजितदादांनी बारामती च्या स्वच्छतेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. स्वच्छता व्यवस्थेसाठी आधुनिक यंत्रणा उभारण्यावर त्यांचा कायम भर होता. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या गरजा ओळखून ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल आणि स्वच्छ, सुंदर बारामतीचे दादांचे स्वप्न अधिक बळकट होईल.”

बारामती नगरपरिषदेचे आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यासंदर्भात बोलताना म्हणाले की, “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही बारामतीच्या विकासाकडे विशेष लक्ष देतात. ‘ स्व. अजितदादांनी बारामतीला जे दिले, त्या विकासाच्या परंपरेत आपण आणखी काय भर घालू शकतो,’ हा विचार त्या सातत्याने करत असतात. त्याच भावनेतून त्यांनी बारामतीला ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून दिली आहे. ही केवळ एक मशीन नसून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि बारामतीच्या आधुनिक स्वच्छता व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.”

Web Title: Baramati municipal council advanced sewer suction jetting machine sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
1

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
3

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा
4

बारामतीतील आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाने शेतकरी, विक्रेत्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.