Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Baramati News : बारामतीमध्ये जुन्या वादातून एका युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. डोके, मान, हात आणि पाठीवर वार करून आरोपी पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना जेरबंद केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 22, 2026 | 09:00 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • घटना कुठे आणि कशी घडली
  • ट्रॅक्टरच्या कामावरून जुना वाद
  • गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक वसंत वाघोले करीत आहेत.
Baramati News : तालुक्यातील कार्हाटी येथे युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना सुपा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. निलेश उर्फ अमोल सदाशिव जाधव (वय २७, रा. कार्हाटी) यांच्यावर जुन्या किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अमोल जाधव यांच्यावर शेवाळवाडी, पुणे येथील लोटस् रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटना कुठे आणि कशी घडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास कार्हाटी येथील भैरवनाथ हॉटेलसमोर ही घटना घडली. ऋतिक बाळासो गिरमे (रा. कार्हाटी) आणि ओमकार हरिभाऊ भगत (रा. लोणीपाटी, लोणी भापकर, ता. बारामती) हे दोघे पिकअप वाहनातून घटनास्थळी आले. त्यानंतर हातातील लोखंडी धारदार कोयत्याने अमोल जाधव यांच्या डोक्यावर, मानेच्या डाव्या बाजूस, डाव्या हाताच्या बोटांवर, डाव्या हाताच्या पोटरीवर तसेच पाठीवर वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जखमीच्या आई द्वारका सदाशिव जाधव यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुपा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माहिती संकलित केली. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी दोन तपास पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केली.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनेपासून अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि १९ सप्टेंबर रोजी कायदेशीररीत्या अटक केली.

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद

ट्रॅक्टरच्या कामावरून जुना वाद

अमोल जाधव आणि आरोपींकडे ट्रॅक्टर असून, जमीन लेव्हल करण्याचे काम घेण्यावरून यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. याच जुन्या वादातून हल्ला केल्याचे आरोपींनी पोलिस तपासात सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक वसंत वाघोले करीत आहेत.

या कारवाईत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय पवार, पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, रूपेश साळुंखे, महेंद्र गायकवाड, दत्तात्रय धुमाळ तसेच पोलीस अंमलदार तुषार जैनक, किसन ताडगे, महादेव साळुंखे, सचिन कोकणे आणि निहाल वणवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Baramati news a violent end to an old feud repeated blows inflicted with a sickle two arrested within 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Attempt to Murder
  • baramati
  • Latest Marathi News
  • Latest pune news update
  • Marathi News

संबंधित बातम्या

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
1

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Hollywood News : हेडन पॅनेटीअरच्या मृत्यूचं गूढ उकललं; फेंटॅनिलसह इतर पदार्थांच्या विषारी परिणामाने मृत्यू
2

Hollywood News : हेडन पॅनेटीअरच्या मृत्यूचं गूढ उकललं; फेंटॅनिलसह इतर पदार्थांच्या विषारी परिणामाने मृत्यू

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
3

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
4

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.