Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Police: बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप! ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल; ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द

बारामती तालुका पोलिसांनी तांत्रिक प्रणालीचा वापर करून गेल्या ६ महिन्यांत तब्बल ४ लाख रुपये किमतीचे २२ हरवलेले मोबाईल शोधून काढले आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या उपस्थितीत हा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 07, 2026 | 07:27 PM
बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप!

बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप!

Follow Us
Follow Us:

 

  • बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप!
  • ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल
  • ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द
बारामती, प्रतिनिधी: हरवलेला चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळणे हे अनेकांसाठी अशक्यप्राय वाटत असते. मात्र बारामती तालुका पोलिसांनी तंत्रज्ञानाची साथ, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नागरिकाभिमुख कामकाजाच्या बळावर ही समजूत खोटी ठरविली आहे. आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा माग काढत पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल २२ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. चार लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून बारामती तालुका पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

बारामती तालुका पोलीस स्टेशनकडे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जानेवारी महिन्यात ११ मोबाईल शोधून संबंधितांना परत देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांपूर्वी आणखी ११ मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण २२ मोबाईल मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.

बारामतीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी अमृता लॉजवर छापा टाकला अन्…

शोधण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विविध कंपन्यांच्या महागड्या मोबाईलचा समावेश असून त्यांची एकत्रित किंमत चार लाख रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे हे मोबाईल धारक बारामतीसह विविध गावांतील तसेच इतर जिल्ह्यांतील नागरिक आहेत. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी बारामती तालुका पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. दरम्यान, आणखी दोन मोबाईलचे ट्रेसिंग सुरू असून त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे मोबाईलही लवकरच संबंधितांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

हरवलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन तो मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याच्या बारामती तालुका पोलिसांच्या या उपक्रमामुळे पोलिसांबद्दलचा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेला अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार नितीन ढवण शाहरुख शेख यांनी केली आहे.

‘हरवलेला चोरी गेलेला मुद्देमाल मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असते. नागरिकांना पुन्हा मोबाईल मिळाले याचे समाधान आहे. -चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक. 

अरे, आम्ही प्रेम पण करायचे नाही का? Baramati मध्ये प्रेमीयुगुलावर कोयत्याचा धाक दाखवला अन्…

Web Title: Baramati taluka police recovers 22 lost mobile phones worth 4 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • baramati news
  • Baramati Police
  • Police News
  • Pune

संबंधित बातम्या

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
1

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
2

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.