Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु

बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरील सशस्त्र हल्ला प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2026 | 01:39 PM
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला 'हा' मोठा संशय; कसून तपास सुरु

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला 'हा' मोठा संशय; कसून तपास सुरु

Follow Us
Follow Us:
  • राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात दोघांना अटक, अल्पवयीन बालक ताब्यात
  • हल्ल्यासाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय
  • फोटो काढण्याच्या बहाण्याने जवळ येत धारदार शस्त्राने हल्ला
बारामती : बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरील सशस्त्र हल्ला प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणात पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०) या दोघांना अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे बारामतीसह परिसरातील व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

हल्ल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पुणे शहर पोलिसांनी पार्थ अवथळे आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशी आणि तांत्रिक तपासातून ज्ञानदेव शिंदे याने हल्ल्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा : वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त

छायाचित्राच्या बहाण्याने जवळीक

तपासातील प्राथमिक माहितीनुसार, सूर्यवंशी हे आपल्या ताफ्यासह बारामती परिसरात आले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगत छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. याच बहाण्याने जवळ आलेल्या एका हल्लेखोराने पिस्तूल काढल्याचे समोर आले आहे. पिस्तूल जाम झाल्याने गोळी झाडली गेली नसल्याची माहिती आहे. त्यानंतर सूर्यवंशी यांनी प्रतिकार केला असता हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेवेळी उपस्थित असलेल्या पोलीस अंगरक्षकाने आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र झटापटीत एका आरोपीने त्याच्या हाताला चावा घेतला आणि आरोपी पसार झाले. राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कंपनीचे मालक असून, त्यांचे महाराष्ट्रासह गोव्यात व्यावसायिक कामकाज आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

तळेगाव दाभाडेतील घटनेनं खळबळ

मोबाईलवर ठेवलेल्या ‘King Is Back’ या स्टेटसच्या कारणावरून तळेगाव दाभाडे येथे एका १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानात घुसून तीन जणांनी या मुलावर कोयत्याने वार केले आहेत. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात किती जणांना ताब्यात घेतले आहे?

    Ans: या प्रकरणात पार्थ वासुदेव अवथळे (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०) यांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

  • Que: हल्ल्यासाठी किती रुपयांची सुपारी दिल्याचा संशय आहे?

    Ans: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • Que: राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला कसा करण्यात आला?

    Ans: प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी चाहते असल्याचे सांगून छायाचित्र काढण्याच्या बहाण्याने सूर्यवंशी यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिस्तूल काढण्यात आले; मात्र ते जाम झाल्याने गोळी झाडली गेली नाही. पुढे धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: The police have expressed strong suspicion regarding the rana suryavanshi attack case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Arrested News
  • baramati news
  • crime news

संबंधित बातम्या

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
1

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!
2

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
3

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह
4

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.