Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीच्या महिलांकडून दुबईला हिरवी मिरची निर्यात! ग्रामीण महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकल्या

बारामतीतील ३० महिला शेतकऱ्यांनी एकत्र येत तब्बल ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यश मिळवले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 29, 2025 | 07:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून बारामतीतील ३० महिला शेतकऱ्यांनी एकत्र येत आधुनिक पद्धतीने उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवली आणि तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादन दुबईला निर्यात करण्याचा मोठा विक्रम केला. या उपक्रमाची अंमलबजावणी संघर्ष क्लस्टर मायक्रो रिसोर्स सेंटर (CMRC), बारामती यांनी केली. कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी महिलांना तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच खरेदीसाठी हमी करार आदी नेचर फूड्स प्रा. लि. या कंपनीसोबत करण्यात आला, ज्यामुळे महिलांना थेट बाजारपेठ उपलब्ध झाली.

गणेशोत्सव पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड; सोशल मीडिया रिल्स अन् ब्लाँगर स्पर्धेचे आयोजन

या प्रकल्पाअंतर्गत २२ एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर शेती करण्यात आली. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, सेंद्रिय खतांचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक तंत्रांचा अवलंब करण्यात आला. शिवाय नेदरलँड तंत्रज्ञानावर आधारित उगमशिव वाणाची मिरची लावली गेली. या पद्धतींमुळे महिलांना सरासरी ६,००० किलो मिरचीचे उत्पादन मिळाले. त्यापैकी स्मिता पवार (७,६९२.५ किलो), रोहिणी जाधव (७,६६७.५ किलो) आणि राणी जामधडे (६,०५२.५ किलो) यांचे उत्पादन विशेष ठरले.

निर्यातीसाठी उत्पादनाची गुणवत्ता टिकविणे, अनियमित पाऊस आणि काढणीनंतरची आव्हाने ही मोठी अडचण होती. त्यावर मात करण्यासाठी सातत्याने फील्ड मार्गदर्शन, पीक विमा आणि प्रक्रिया प्रशिक्षण दिले गेले. पुढील टप्प्यात या प्रकल्पासाठी स्थळावर ग्रेडिंग युनिट उभारण्याची योजना आहे, ज्यामुळे निर्यात अधिक गुणवत्तापूर्ण व सुलभ होईल.

या यशामुळे ग्रामीण महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढले असून त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. यामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान वाढले, उद्योजकीय कौशल्य विकसित झाले आणि शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.

Thane News : विसर्जनाच्या नावाखाली डम्पिंग ग्राऊंडवर गणेश मूर्तींची विल्हेवाट; डायघर गावातील धक्कादायक प्रकार

बारामतीतील या महिलांच्या प्रयत्नांमुळे सिद्ध झाले की ग्रामीण महिला कृषी मूल्यसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक ‘स्केलेबल व रीप्लिकेबल मॉडेल’ ठरत आहे, ज्याचा लाभ भविष्यात राज्यातील इतर भागांतील महिलांनाही होऊ शकतो.

Web Title: Baramati women export green chillies to dubai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 07:28 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati

संबंधित बातम्या

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीनाट्य; रात्रीतच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवले
1

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजीनाट्य; रात्रीतच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवले

Ajit Pawar: कृषी क्षेत्रात AI ची एन्ट्री होणार; अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
2

Ajit Pawar: कृषी क्षेत्रात AI ची एन्ट्री होणार; अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Pune News: ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश; ४० मेट्रिक टन हिरव्या मिरचीची दुबईला निर्यात
3

Pune News: ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश; ४० मेट्रिक टन हिरव्या मिरचीची दुबईला निर्यात

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना
4

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.