Dr Nilesh Potdar Wins Asia's Modern Hero Award 2026:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
डॉ. पोतदार यांचं नाव ब्रेन आणि स्पाइन सर्जरीमध्ये मोठं आहे. ज्या सर्जरी करायला अनेक डॉक्टर घाबरतात, त्या सर्जरी ते अगदी अचूकपणे करतात. त्यांची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी.यात काय होतं तर पाठीच्या मणक्याची सर्जरी करताना मोठा काप द्यावा लागत नाही. छोट्याशा छिद्रातूनच कॅमेरा टाकून सर्जरी केली जाते.
Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या – Navarashtra
त्यामुळे पेशंटला वेदना कमी होतात, रक्त पण कमी जातं आणि पेशंट दोन-तीन दिवसात चालायला लागतो. आधी अशा सर्जरीनंतर महिना भर आराम करावा लागायचा, आता तसं नाही.त्यांच्या या अचूक उपचार पद्धतीमुळेच त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. याआधी 2025 मध्ये पण त्यांना मोठा सन्मान मिळाला होता. सिलिकॉन इंडिया हेल्थकेअरने त्यांची निवड देशातल्या टॉप 10 न्यूरोसर्जनच्या यादीत केली होती.
पुरस्कार मिळाल्यावर डॉ. निलेश पोतदार म्हणाले, “अचूक उपचार हेच माझं ध्येय आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. हा सन्मान फक्त माझा नाही, तर मर्क्युरी हॉस्पिटल आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमधील माझ्या पूर्ण टीमचा आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या लोकांना मुंबईला न जाता ठाण्यातच ब्रेन आणि स्पाइनचे अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”
ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या
खरंच ठाणेकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आधी अशा मोठ्या सर्जरीसाठी लोकांना मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं. पण आता तेच आधुनिक तंत्रज्ञान आणि तेच एक्सपर्ट डॉक्टर ठाण्यातच उपलब्ध आहेत. डॉ. पोतदार यांच्या रूपाने ठाण्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा न्यूरोसर्जन मिळाला आहे.या पुरस्कारामुळे आता ठाण्याचं नाव वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं आहे. भविष्यात त्यांच्या हातून अजून मोठं काम होईल अशी अपेक्षा आहे.






