Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम! ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ; समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण

Bavdhan Nana Nani Park: वाईच्या बावधन येथे मंगलमूर्ती सोशल क्लबने सामाजिक बांधिलकीतून ग्रामदैवत भैरवनाथाच्या मूळ स्थानाजवळ ‘नाना-नानी पार्क’ उभारण्याची मुहूर्तमेढ रोवली. पर्यावरण, आरोग्य आणि समाजहिताच्या उपक्रमांची परंपरा जपत क्लबने ज्येष्ठांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 14, 2026 | 09:00 PM
बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम! ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ; समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण
Follow Us
Follow Us:
  • बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम
  • ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ
  • समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण
वाई : “वारसामध्ये फक्त पैसाच नसतो, तर कधी कधी तो चांगल्या कर्माचाही असतो…” या विचाराला कृतीची जोड देत बावधन येथील मंगलमूर्ती सोशल क्लबने सामाजिक बांधिलकीची परंपरा पुढे नेत ग्रामदैवत भैरवनाथाचे मूळ स्थान असलेल्या पाचीदेवळ प्रवेशद्वाराजवळ ‘नाना-नानी पार्क’ उभारण्याची मुहूर्तमेढ रोवली.सुमारे दोन दशकांपूर्वी जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून बावधनमधील समवयस्क व समविचारी तरुणांनी ‘थोडंसं काही समाजासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन मंगलमूर्ती सोशल क्लबची स्थापना केली. स्थापनेपासूनच क्लबने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण तसेच विविध समाजहितोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत. त्यामुळे क्लबने बावधन परिसरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Malhar Conclave 2026: ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन

क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजोपयोगी कार्यात आता ‘नाना-नानी पार्क’ या उपक्रमाची भर पडली आहे. या पार्कमध्ये सर्व बावधनकरांना विरंगुळ्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना निवांत वेळ घालवण्यासाठी उपयुक्त अशी बैठक व्यवस्था, शोभिवंत झाडे आणि विद्युत प्रकाश व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यातील प्रारंभिक टप्पा म्हणून परिसरात विविध सुशोभित झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

आपण ज्या मातीत जन्मलो, वाढलो त्या मातीचे ऋण फेडण्याच्या उदात्त भावनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच बावधनच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी निवांतपणे बसता येईल, संवाद साधता येईल आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येईल, अशी जागा या पार्कच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. अरुणादेवी पिसाळ, बावधनच्या सरपंच सौ. वंदना कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अरुणादेवी पिसाळ यांनी मंगलमूर्ती सोशल क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. तसेच क्लबने अंत्ययात्रेसाठी तयार केलेल्या रथाचे कार्यही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरपंच सौ. वंदना कांबळे यांनीही क्लबच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगलमूर्ती सोशल क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकीची ही वाटचाल अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार

Web Title: Bavdhan nana nani park mangalmurti social club social initiative wai satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • social work
  • Tree
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Wai – एम.आय.डी.सी.तील ‘अर्थव फाउंड्री’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai – एम.आय.डी.सी.तील ‘अर्थव फाउंड्री’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
2

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Wai News: धान्य गोदामामागील रस्ता चिखलात; प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक, व्यापारी व ग्राहक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी
3

Wai News: धान्य गोदामामागील रस्ता चिखलात; प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक, व्यापारी व ग्राहक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
4

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.