Crime
सिल्लोड : आनंद नगरी पाहत असताना गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरुन एका युवकाचे लोखंडी पाईपने डोके फोडल्याची घटना घडली. ही घटना रविवारी रात्री शहरातील छत्तीस एकर परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख जब्बार, अहमद प्यारेलाल हसन, शेख सद्दाम शेख गफ्फार, शेख अजर शेख जफर (सर्व रा. सिल्लोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री छत्तीस एकर परिसरात मित्रांसोबत आनंद नगरी पाहत असताना गर्दी असल्याने शेख जब्बारला धक्का लागला. यामुळे त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. याच दरम्यान अहमद प्यारेलाल हसन, शेख सद्दाम शेख गफ्फार, शेख अजर शेख जफर यांनीही शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली.
तर अहमद प्यारेलाल हसन याने लोखंडी पाइप डोक्यात मारुन जखमी केले, अशी तक्रार मोहम्मद जावेद मोहम्मद ताहेर कुरैशी (रा. स्नेहनगर, सिल्लोड) याने दिली. या तक्रारीवरुन सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील तळेकर करत आहेत.