दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला विटाने मारहाण करून ऐवज लांबवला; पोलिसांना माहिती मिळताच... (फोटो सौजन्य- PINTEREST)
बनावट शिक्षक व मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदासाठी नेमणूक दिल्या प्रकरणी दोघांला अटक करण्यात आली आहे. आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी केली आहे,
खासगी वसतिगृहात बालकांवर अमानुष अत्याचार; कल्याणमध्ये लैंगिक शोषण आणि मारहाणीची गंभीर घटना
भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा गावातील नानाजी पुंडके शाळेत मुख्याध्यापक म्हणून नेमणूक मिळालेल्या मुख्याध्यापकाने कधीच आमच्या कडे शिक्षक म्हणून नोकरी केलेली नाही. त्यामुळे त्यांचे अनुभवाचे दाखले खोटे असल्याचे संबंधित शाळेने कळवल्यानंतर ही नागपूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्या मुख्याध्यापक विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
पुंडके शाळेतील मुख्याध्यापक पराग पुंडके यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपी मुख्याध्यापक पराग पुंडके याला शिक्षक पदाचा कोणताही अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून त्याने कुठेही काम केले नसताना सरळ मुख्याध्यापक बनविण्यात आले होते. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना नागपूर पोलिसांनी काल (11 एप्रिल) रात्री अटक केल्यामुळे शिक्षण विभागात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू असून आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.
आरोपी वाढण्याची शक्यता;
विशेष म्हणजे बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात यापूर्वी वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले होते. शिक्षक म्हणून कोणताही अनुभव नसताना पुंडकेची मुख्याध्यापक म्हणून नेमणुक करत शालार्थ आयडी ही देण्यात आला होता. पराग पुंडकेने नागपुरातील ज्या शाळेचे दस्तावेज देत त्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीचा प्रदीर्घ अनुभव असल्याचा दावा केला होता. पोलीस तपासत त्याच शाळेने पोलीस तपासात स्पष्ट केले की, पराग पुंडके त्यांच्याकडे कधीच नोकरीला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी नरड आणि पुंडके या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, यात आणखी कोण आरोपी आहे, या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलीय.