Beed Upsarpanch Govind Barge commits suicide shooting himself connection with dancer Pooja Gaikwad
बीड : प्रेमामध्ये असलेला व्यक्ती टोकाचं पाऊल उचलायला मागे पुढे पाहत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. बीडमधील एका उपसरपंचाने नर्तकीच्या प्रेमामध्ये आत्महत्या केली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते कला केंद्रातील नर्तिके प्रेमात पडले होते मात्र त्यानंतर बोलणं बंद झाल्यामुळे गोविंद बर्गे यांनी नर्तिकेच्या घरासमोर आत्महत्या केली.
माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमामध्ये पडले. आकंठ प्रेमामध्ये बुडालेल्या गोविंदा यांनी पूजाला महागडे मोबाईल, दागिने आणि अनेक गिफ्ट्स दिले. मात्र यानंतर गोविंद आणि पूजा यांच्यामधील संबंध बिघडले. दोघांमधील वाद टोकाला पोहचला आणि चिघळला. त्यानंतर पूजाने गोविंद बर्गे यांच्यासोबत बोलणे बंद केले. याचा मोठा धसका माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी घेतला. त्यानंतर थेट त्यांनी बार्शी तालुक्यातील सासुर हे पूजाचे गाव गाठले आणि तिच्या घरासमोर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाद वाढल्याने नर्तिका पूजा गायकवाड हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्याशी बोलणे टाळले होते. यामुळे त्रस्त झालेल्या गोविंद बर्गे यांनी बार्शी तालुक्यातील सासुर या पूजा गायकवाड हिच्या गावी गेला. काही दिवसांपासून पूजाने गोविंद यांच्याशी बोलणे बंद केले. पूजामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेट झाली, पण त्यांचे समाधान झाले नाही आणि थेट त्यांनी पूजाच्या घरासमोर लावलेल्या आपल्या गाडीत बसून स्वत:वर गोळी झाडली. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गोविंदाकडून पूजाला महागड्या भेटवस्तू
लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. त्याचबरोबर त्यांचे राजकारणामध्ये देखील प्रस्त असून ते गावाचे माजी उपसरपंच होते. गेवराईमध्ये त्यांचा मोठा बंगला असून त्यांच्याकडे वाडवडिलांची मोठी शेतीही त्यांच्याकडे होती. राजकारणातही सक्रिय असून त्यांच्याकडे पैशांची कोणतीही कमी नव्हती. मात्र गोविंद यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता. मागील काही वर्षांपासून गोविंद हे थापडीतांडा येथील कला केंद्रात सतत जात. तिथे त्यांची ओळख पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. हळूहळू गोविंद हे पूजाच्या प्रेमात पडले. तिला महागड्या भेट वस्तू देण्यास त्यांनी सुरूवात केली. मात्र यानंतर दोघांमध्ये वाद झाला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नर्तिकी पूजासोबत गोविंद यांचे प्रेमप्रकरण असले तरी गोंविद यांचे लग्न झालेले होते. गोविंद यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. गोविंद यांना एक मुलगी तर एक मुलगा आहे. पूजाने अचानक गोविंद यांच्याशी बोलणे बंद केले. पूजाने बोलावे याकरिता गोविंदा यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, पूजा बोलत नव्हती. गोविंद यांच्या गेवराईच्या बंगल्यावरून दोघांमध्ये वाद होता. पूजा तो बंगला स्वत:च्या नावावर कर म्हणून गोविंदच्या मागे लागली होती. असेही सांगितले जाते की, यावरून पूजा गोविंदला सारखी धमकावत देखील होती. यानंतर बोलत नसल्यामुळे गोविंद हे पूजाच्या घरी गेले. मात्र, पूजाच्या घरातून बाहेर येत गोविंद याने गाडी आतमधून लॉक करून गोळी झाडली. या प्रकरणामुळे आसपासच्या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.