Demand Dolby Systems : बीडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टमला परवानगी देण्याची मागणी सार्वजनिक गणेश मंडळांनी केली आहे. प्रशासनाने डीजे आणि डॉल्बीवर बंदी कायम ठेवली असून नियम मोडल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. काही मंडळांनी डॉल्बीला परवानगी न दिल्यास विसर्जन न करण्याची धमकी दिली आहे.
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Follow Us:
Follow Us:
विस्तार
विसर्जन न करण्याची धमकी
बीड प्रशासनाचा पवित्रा
ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्याचे आवाहन
Demand Dolby Systems : आज आनंत चतुर्थी आहे, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त मोठ्या जल्लोषात मिरवणुक काढतात, मिरवणुकी दरम्यान ढोल- ताशे, डीजे, डाॅल्बी साऊंड सिस्टम वाजवण्यासाठी वापर केला जातो.
मुंबई – पुण्यात डीजे आणि डॅाल्बी साऊंड सिस्टम सरास वाजवले जातात. याच कारणावरुण बीडच्या सार्वजनिक मंडळानी सुद्धा डाॅल्बी साऊंड सिस्टमची मागणी केल्याचे दिसत आहे. बीड मध्ये प्रशासनाने डाॅल्बी साऊंड सिस्टम वर पूर्णपणे बंदी घातली असताना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. तर डाॅल्बी लावू दिला नाही तर बाप्पाचे विसरजन होणार नाही, अशी धमकी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिली आहे.
बीड जिल्हा प्रशासनआणि पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने यंदा डीजे आणि साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घातली आहे. हे आदेश केवळ गणेश विसर्जनासाठी नाही तर लग्न समारंभ आणि इतर शुभकार्यासाठी आहे. परवाना नसताना जर डीजे किंवा डाॅल्बी वाजवला तर थेट पोलिस कारवाई होणार.
धानोरा रोडवर एका लॉन्सवर लग्नकार्यात डीजे वाजवल्या मुळे पोलिसांनी सिस्टीम जप्त करण्यात आले,तसेच जनरेटरसाठी वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार करणाऱ्यांवर सुद्धाकडक कारवाई करण्यात येणार आहे.
विसर्जन न करण्याची धमकी
बीज मध्ये डाॅल्बी साऊंड साठी गणेश मंडळ आक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे. जसे मुंबई – पुण्यात आणि संभाजी नगर व कोल्हापूर मध्ये डॉल्बीसाठी सांऊडची परवानगी देण्यात आली तशी परवानगी आम्हाला सुद्धा द्यावी, अशी मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडुन होत आहे. तब्बल १५ ते २० मंडळानीं डॉल्बी सांऊडची मांगणी केली असून बीडच्या हिरालाल चौकात हे सर्व गणेश मंडळ रस्ता अडवून बसले आहेत.
बीड प्रशासनानी आणि पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास पूर्णपणे बंदी घातली असून याचे नियम मोडल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या मध्ये 1759 मंडळाना नोंदीसा बजावण्यात आल्या आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त केला असून, यात 4000 पेक्षा अधिक पोलिस तैनात केले आहे. मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी एआय (AI) ड्रोनचा आणि हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला आहे.
ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्याचे आवाहन
पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्याचे आवाहन केले असून मिरवणुका मध्ये हलगी, ढोल-ताशा, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरातच काढण्याचे निर्देश दिले आहे.