Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिकडे तिकडे खोदकाम अन् राडारोडा; विकास कामाचा प्रवाशांना मोठा फटका, बेस्ट बसचे 97 मार्ग बदलले

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहे. त्यामुळे अनेक रस्ते हे खोदून ठेवले आहे. तसेच मेट्रोचे काम देखील सुरु आहे. याचा फटका बेस्ट बसच्या वाहतुकीला होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 28, 2025 | 01:19 PM
BEST bus routes disrupted due to road excavation and metro work in Mumbai

BEST bus routes disrupted due to road excavation and metro work in Mumbai

Follow Us
Follow Us:

मुंबई : शहरातील अंतर्गत वाहतूकीवर सध्या मोठा प्रमाणात परिणाम होत आहे. रस्त्यांचे सुरु असलेले काम आणि बसचे मार्ग यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.  प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यातच शहर आणि उपनगरांत सध्या सुरु असलेल्या विविध कामांचा बेस्टच्या वाहतूकीचा चांगलाच फटका बसला आहे. शहरात सुमारे 35 टक्के रस्त्यांचे एकाच वेळी काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. तसेच मेट्रो, पुलांची पुर्नबांधणी, नाल्यांवरील पुलांची बांधणी अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांमुळे बेस्टच्या 23 डेपोतून सुटणाऱ्या सुमारे 97 बस मार्गावरील जवळपास 189  बस वळवल्या आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील प्रवाशांची गैरसोय होत असून बेस्टच्या, महसुलावरही परिणाम होत आहे.

प्रवाशांची बससाठी ४५ मिनिटे प्रतीक्षा

बेस्ट बस ही मुंबईकरांची ‘सेकण्ड लाईफलाईन’ आहे. किफायतशीर आणि स्वस्त तिकिट दरामुळे बसने प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्य देतात. सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ 2 हजार 800  बस आहेत. त्याद्वारे सुमारे 32  लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. बसची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने प्रवाशांना बसकरिता किमान 45  मिनिटे वाट पहावी लागत आहे. त्यातच शहरात बहुतेक सर्वच ठिकाणी विविध कामे सुरु आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

थांबेही बंद

गेल्या पाच ते सहा वर्षापासून मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. त्यामुळे तेथील बस थांबेही बंद ठेवले आहेत. दुसरीकडे पालिकेने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतल्याने बेस्टला मार्ग वळवावे लागले आहेत. सुमारे ९७ बस मार्गावरील जवळपास १८९ बस वळवण्यात आल्या आहे.

प्रवाशांना मोठा फटका

मुंबई महापालिकेतर्फे संपूर्ण मुंबईतील तब्बल ३५ टक्के रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे एकाच वेळी हाती घेण्यात आली आहे. मेट्रोची कामे सुरु आहेत. यामुळे मुंबईकरांना रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे वाहन चालकांना वाहतुक कोडींचा सामना करावा लागत आहे. त्याचा फटका बेस्टला देखील बसला आहे. रस्त्यांचे काम सुरु असल्याने बस पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक प्रवाशांना जादा पैसे मोजूना रिक्शा-टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. तर प्रवास वेळेत देखील वाढ होत आहे. शहरात ३७ हून अधिक रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे अंदाजे पाच महिने चालणार चालणार: आहेत. त्यामुळे तेथील बेस्टचे बसमार्ग अन्य ठिकाणाहून वळवावे लागले आहेत. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अल्प प्रतिसाद असणारे थांबे होणार बंद

बेस्टच्या बसची घटलेली संख्या आणि प्रवाशांना थांब्यावर बसकरिता पहावी लागणारी प्रतिक्षा वेळ वाढल्याने बेस्टने नवी शक्कल लढविली आहे. शहरातील अल्प प्रतिसाद असलेले बस मार्ग बंद करून त्यामार्गावरील बस जास्त गर्दीच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे अल्प प्रतिसादाच्या मार्गांचा अभ्यास केला जात असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील असे सुमारे २० पेक्षा जास्त मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. बसची कमी होणारी संख्या लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने बसमार्गाचा अभ्यास सुरुवात केला असून अल्प प्रतिसाद मिळत असलेले मार्ग बंद करून त्या मार्गावरील बस गर्दीच्या मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. प्रवासी संख्या कमी असलेले २० पेक्षा जास्त मार्ग बंद करण्याचा विचार सुरू असून सध्या त्याचा अभ्यास सुरू आहे. तर एक ते दोन तासांचा अंतरावर प्रवास करणारे प्रवासीही अल्पच असून हे मार्गही बंद करण्याचा विचार आहे.

Web Title: Best bus routes disrupted due to road excavation and metro work in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
1

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी
2

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक
3

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
4

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.