संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : टॉम-टॉम या जागतिक संस्थेने पुणे वाहतूक कोंडीत चौथा क्रमांकावर असल्याचे जाहिर केल्यानंतर पुणे पोलिसांनी विविध उपाययोजनांसोबतच कोंडीची कारणे देखील शोधत त्याचा अभ्यास केला आहे. जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांच्या या अभ्यासातून वेगवेगळ्या कारणास्तव सव्वा चारशेवेळा वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, पोलिसांनी यातूनही स्पष्टता आणत कोंडी टाळता येणारी कारणे व टाळता न येणारी कारणेही, शोधली आहेत. यानूसार आता कोंडी न होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची तीच परिस्थिती आहे. पण त्यावर वाहन संख्या मात्र, वर्षाला लाखाने वाढत आहे. त्यामुळे आपसूकच कोंडी वाढतच चालली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस व महापालिका एकत्रित काम करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी नव्याने प्रयोग सुरू करून ते यशस्वी करून दाखविले आहेत. शहरातील प्रचंड कोंडीचे चित्र हळू-हळू कमी होत असल्याचेही जानवत आहे.
काही वेळा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी होते. तर, काही वेळा नागरिकांच्या चुकीमुळे व याठिकाणी पोलीस उपस्थित नसल्याने कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी ३ महिन्यांचा शहाराचा आढावा घेतला आहे. त्यात सर्वाधिक कोंडी वाहने रस्त्यावर बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले आहे. ३ महिन्यात तब्बल ११४ वेळा वाहने बंद पडल्याने कोंडी निर्माण झाली. त्यात सर्वाधिक पीएमपी बसेसची संख्या आहे. त्यासोबतच अचानक आलेल्या वाहतूक फ्लोमुळे कोंडी निर्माण झाली. कार्यक्रम पार पडल्यानंतर तसेच सुरू होण्यापूर्वी एकाच भागात अचानक वाहन संख्या वाढते आणि त्या परिसरात कोंडी निर्माण होते. अशा पद्धतीने ३ महिन्यात १२८ वेळा कोंडी निर्माण झाली आहे. त्यासोबतच, बेशिस्त वाहन लावणे, चालविणे, खड्डे, अपघात, रस्त्यांची कामे, वेगवेगळे कार्यक्रम तसेच सिग्नल बंद पडण्याच्या घटनांमुळे देखील कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.
टाळता येणारी वाहतूक कोंडी
न टाळता येणारी वाहतूक कोंडी