समृद्धी महामार्गावर अपघात
मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्य झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात बोलोरो आणि ट्रकमध्ये झाला. हा भीषण अपघात मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील बेला इथं (२७ एप्रिल) रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
Pune Crime : एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाची फसवणूक; तब्बल 25 हजारांना घातला गंडा
महामार्गावरून वळत असतांना अपघात
पुढे आलेल्या माहिती नुसार, रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात ५ जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादांमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चालक गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस आणि गाडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविलं. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.
अपघातातील मृतकांचे नावं
1) शिलेंद्र बघेल
2) शैलेश गोकुळपुरे
3) विनोद बिनेवार
4) अशोक धैरवाल
जखमी
1) अविनाश नागतोडे (चालक)
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, खासदारांनीच बनवला व्हिडिओ
भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं काल हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. मात्र, लाईट गेल्याने नागरिकांसाठी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सायंकाळच्या सुमारास सुमारे अर्धा ते पाऊण तास पडलेल्या या मुसळधार अवकाळी पावसानं साकोली शहरातील आठवडी बाजारातील शेतकरी, व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यानं वीज जनित्रांमध्ये बिघाड निर्माण झाल्यानं भंडारा शहरासह ग्रामीण भागातील दोन तास वीज पुरवठा खंडीत झाल्यानं नागरिकांना अंधारात राहावं लागलं. अवकाळी पावसांनंतर भंडारा शहरासह ग्रामीण भागात दोन तास वीज पुरवठा खंडित झाला होता. तर, मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भिलवाडा इथं उड्डाण पुलावर पाणी साचलं. इथून जाणारे खासदार प्रशांत पडोळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिथं थांबून प्रश्नाच्या भोंगळ कारभाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अवकाळी पावसानं उन्हाळी भात पिकाला संजीवनी मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या घरात पोहचलंय.
कर्जत तालुक्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी ‘ही’ फाउंडेशन अग्रेसर