कर्जत तालुक्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी 'ही' फाउंडेशन अग्रेसर
कर्जत तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन चे माध्यमातून टँकर सुरू करण्यात आले आहेत. प्रामुख्याने पाणी टंचाई जाणवत असलेल्या खांडस आणि पाथरज ग्रामपंचायती मधील 36 गावे आणि वाड्या यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.
पाण्याची भूजल पातळी खालावल्यामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू केले जातात. यावर्षी देखील कर्जत तालुक्यात पाण्याची टंचाई असलेल्या भागात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.
लाल मातीची तस्करी करणाऱ्यांना महसूल विभागाचा दणका ! 5 शेतकऱ्यांवर 20 लाखाची दंडात्मक कारवाई
आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनचे संपर्क कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवन मध्ये पाण्याची टंचाई असलेल्या भागातील रहिवाशी यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्यावर आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनचे कार्यकर्ते तत्काळ त्या गावाची किंवा वाडीची पाहणी करतात आणि तेथे पाण्याचे टँकर सुरू केले जातात. यावर्षी एप्रिल महिन्याचे दुसऱ्या आठवड्या पासून पाण्याचे टँकर फाऊंडेशन कडून सुरू करण्यात आले आहेत.
आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन कडून खांडस आणि पाथरज जिल्हा परिषद गटा मधील टंचाई ग्रस्त गाव आणि वाड्या मध्ये टँकरचे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. खांडस, अंभेरपाडा,ओलमन, नांदगाव,कळंब या ग्रामपंचायती मध्ये तर पाथरज गटात असलेल्या पाथरज,वारे, मोग्रज या ग्रामपंचायती मधील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्यात ओलमन, पेंढरी, बोंडेशेत, झुगरेवाडी, ऐनाचीवाडी, कोतवालवाडी, तेलंगवाडी, मिरचुलवाडी, भागूचीवाडी, चाहुचीवाडी, बनाचीवाडी, पादिरवाडी, बोरीचीवाडी, सुतारपाडा तर खांडस भागातील टेपाची वाडी, बांगर वाडी, गावंडवाडी, चाफेवाडी, पेटारवाडी, वडाची वाडी, मेंगालवाडी, घुटेवाडी, जांभूळवाडी, धाबेवाडी, अंभेरपाडा, काठेवाडी, बेलाची वाडी, मोह पाडा, चिमटेवाडी, चिंचवाडी, गोरेवाडी, विठ्ठलवाडी, भोपळे वाडी, चोंबलवाडी, डामसेवाडी, दिवाळ वाडी,नांदगाव आणि बलिवरे या ठिकाणीं आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन कडून टँकर सुरू आहेत अशी माहिती फाऊंडेशन कडून देण्यात आली आहे.