Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara: बसस्थानकावरील पाणपोई बंदच; परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

भंडारा बसस्थानकावरील २७ वर्षे जुनी 'संत लहरी बाबा जल आशिष' पाणपोई प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाच्या या अनास्थेविरोधात प्रवासी आणि समाजसेवकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 27, 2026 | 05:59 PM
Bhandara: बसस्थानकावरील पाणपोई बंदच; परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती
Follow Us
Follow Us:
  • भंडारा बसस्थानकावर दररोज एक लाख लिटर मोफत पाणी देणारी ऐतिहासिक पाणपोई प्रशासनाने बंद पाडली.
  • ‘नाथ-जल’ सुरू करण्यासाठी पूर्वसूचना न देता जुनी हक्काची पाणपोई बंद केल्याचा बलवानी यांचा आरोप.
  • प्रवाशांची सोय व्हावी म्हणून तात्पुरती आरओ मशीन बसवली असून पाणपोई पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.

जिल्हा मुख्यालयी असलेल्या बसस्थानकावर गेल्या २७ वर्षांपासून प्रवाशांची अविरत तहान भागवणारे ‘संत लहरी बाबा जल आशिष’ ही पाणपोई मागील काही महिन्यांपासून बंद पडली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद पडल्याने प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

समाजसेवी गोपीचंद बलवानी यांनी आपल्या माता-पितांच्या स्मृतीप्रित्यर्थ २९ मार्च १९९८ रोजी स्वखर्चातून या प्याऊची उभारणी केली होती. प्याऊची संपूर्ण देखरेख आणि पाण्याचा खर्च बलवानी परिवारच उचलत होता. या माध्यमातून दररोज सुमारे १ लाख लिटर शीतल जल 5 बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जात होते. प्याऊच्या वर आणि खाली बसवलेल्या मोठ्या स्टोरेज टॅक्सद्वारे २४ तास पाण्याची सोय होती.

Bhandara: ‘पशुसंवर्धन’तर्फे पशुधन रक्षणासाठी लसीकरण मोहीम; पशुपालकांना मिळणार मोठा दिलासा

प्रशासनाची अनास्था

कोणतीही पूर्वसूचना न देता एसटी र महामंडळाने हे जुने आणि हक्काचे प्याऊ बंद पाडून त्याऐवजी आपले “नाथ-जल” सुरू केले. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी मार्च २०२६ पासून प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आले; परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

बलवानी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, ९ मार्च २०२५ रोजी मार्ग निर्माण कार्यादरम्यान पाण्याच्या टंकीच्या आसपास मातीचे ढीग आणि बांधकाम साहित्य टाकण्यात आले. तसेच प्याऊच्या परिसरातील झाडे आणि कुंड्याही विनाकारण हटवण्यात आल्या. आता एसटी प्रशासन या जनहिताच्या कामालाच ‘अवैध’ ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बसस्थानकावर दररोज येणाऱ्या प्रवाशांना फटका बसत आहे.

Bhandara: ३०० कोटींच्या उड्डाणपुलाला ३ वर्षांत गळती; पिलरमधून वाहतेय पाणी, महामार्ग प्राधिकरणाचा कारभार

जल आशिष प्याऊ बंद झाल्यानंतर 6 प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हण्णून इतर दानदात्यांच्या माध्यमातून तात्पुरती आरओ मशीन बसवण्यात आली आहे, ज्यामुळे सध्या प्रवाशांना पिण्यायोग्य पाणी मिळत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सेवा देणाऱ्या ‘जल आशिष प्याऊ’ साठी स्वच्छ आणि योग्य टीडीएस पातळीचे पाणी आवश्यक आहे. हे पाणी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी प्रशासन सकारात्मक प्रयत्न करेल. असे नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, भंडारा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Web Title: Bhandara bus stand sant lahari baba jal ashish water booth closed msrtc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra
  • marathi

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.