Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

खापा येथे ब्रँडेड कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विकल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिस आणि ईआईपीआर इंडियाच्या संयुक्त कारवाईत 76,900 रुपयांचा संशयित माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 06, 2026 | 08:49 PM
Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Follow Us:
  • खापा येथील दोन दुकानांमध्ये टाटा मोटर्स आणि गल्फच्या नावाने बनावट डीईएफ विकल्याचा प्रकार समोर आला.
  • तपासणीदरम्यान डीईएफ डब्यांच्या प्रिंटिंग, रंगसंगती, एमआरपी आणि होलोग्राममध्ये गंभीर विसंगती आढळल्या.
  • पोलिसांनी संयुक्त कारवाईत 76,900 रुपयांचा संशयित माल जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.
खापा क्षेत्रात ब्रँडेड कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड (डीईएफ) विक्री करण्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस प्रशासन आणि ईआईपीआर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयित बनावट माल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या डीईएफच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ईआईपीआर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर आणि तक्रारदार परशुराम सुखदेव कारंडे यांना मिळालेल्या माहितीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. खापा येथील दोन वेगवेगळ्या दुकानांमध्ये टाटा मोटर्स आणि गल्फ यांसारख्या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने नकली डीईएफची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दुकानांवर धाड टाकून तेथील मालाची तपासणी केली.

Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष

डबे आणि पॅकेजिंगमध्ये आढळल्या अनेक त्रुटी

धाडीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या डीईएफच्या डब्यांची पोलिस अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींनी सखोल तपासणी केली. या तपासणीत डब्यांवरील प्रिंटिंग, रंगसंगती, एमआरपी, होलोग्राम आणि मोनोग्राम यामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या. त्यामुळे हा माल बनावट असल्याचा संशय अधिक बळावला.

विशेष म्हणजे, डब्यांवर लावण्यात आलेले होलोग्राम आणि मोनोग्राम स्कॅनरच्या माध्यमातून तपासण्यात आले. मात्र, त्यावरील माहिती संबंधित मूळ कंपन्यांच्या प्रणालीशी जुळत नसल्याचे तपासणीत समोर आले. यामुळे ब्रँडच्या नावाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

76,900 रुपयांचा माल जप्त

पोलिसांनी या कारवाईत एकूण 76,900 रुपयांचा संशयित माल ताब्यात घेतला. यामध्ये टाटा मोटर्स आणि गल्फ कंपनीचे लेबल लावलेले डीईएफचे डबे मोठ्या प्रमाणात आढळले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बनावट उत्पादनाचा स्रोत आणि त्यामागील व्यक्ती किंवा नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे.

 

Web Title: Khapa fake def branded companies police action auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • automobile
  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

Hyundai Aims Rural India Market: ग्रामीण बाजारपेठेत हुंडाईचा मोठा विस्तार; विक्रीत 30% वाट्याचे लक्ष्य
1

Hyundai Aims Rural India Market: ग्रामीण बाजारपेठेत हुंडाईचा मोठा विस्तार; विक्रीत 30% वाट्याचे लक्ष्य

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश
2

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

गणेशोत्सवात कार घेण्याचा विचार करताय? पुणे आणि मुंबई शहरांत हे आहेत पंचांगानुसार ५ सर्वात उत्तम मुहूर्त! आत्ताच पाहून घ्या
3

गणेशोत्सवात कार घेण्याचा विचार करताय? पुणे आणि मुंबई शहरांत हे आहेत पंचांगानुसार ५ सर्वात उत्तम मुहूर्त! आत्ताच पाहून घ्या

5 दमदार इलेक्ट्रिक बाइक्स येत्या वर्षभरात होणार भारतात लाँच! पाहा कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य
4

5 दमदार इलेक्ट्रिक बाइक्स येत्या वर्षभरात होणार भारतात लाँच! पाहा कोणती बाईक ठरेल तुमच्यासाठी योग्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.