Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलासा! ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर, नियम जाणून घ्या

नोंदणी करताना कोणताही गैरप्रकार, चुकीची माहिती किंवा बोगस नोंदणी आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची असणार आहे. दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कडक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 20, 2025 | 07:57 AM
Bhandara News: धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलासा! ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर, नियम जाणून घ्या

Bhandara News: धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलासा! ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर, नियम जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन शेतकरी नोंदणी प्रक्रियेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
  • हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
  • ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य
आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धानविक्रीसाठी आवश्यक असणाऱ्या ऑनलाइन शेतकरी नोंदणी प्रक्रियेला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांची सोय आणि तांत्रिक बाबींचा विचार करून प्रशासनाने नोंदणीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे अद्याप नोंदणी न करू शकलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पणन विभागाने या संदर्भातील सुधारीत शासनपत्र जारी केले आहे.

High Court on Tapovan tree felling : तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक

जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ज्या संस्थांना धान खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत, त्यांनी विहित मुदतीत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने काही कठोर नियम आणि अटी लागू केल्या आहेत, ज्यांचे पालन करणे शेतकरी आणि संस्था या दोघांसाठीही आवश्यक आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी नोंदणी प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. चालू हंगाम खरीप २०२५-२६ चा पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत किंवा रद्द केलेला धनादेश, ओळखपत्रः आधार कार्डची स्पष्ट छायांकित प्रत, शेतकऱ्याचा अधिकृत आणि सुरू असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

गैरप्रकार झाल्यास संस्थांवर होणार कठोर कारवाई

शासकीय नियमानुसार पारदर्शक पद्धतीने नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित खरेदी संस्थांची आहे. नोंदणी करताना कोणताही गैरप्रकार, चुकीची माहिती किंवा बोगस नोंदणी आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. अशा प्रकरणांत दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कडक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी दिला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि ३१ डिसेंबर पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे आधारभूत किमतीचा लाभ मिळणे शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे.

लाइव्ह फोटो आणि प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य

नोंदणी प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. ऑनलाईन नोंदणी करताना संबंधित शेतकरी प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्याचा ‘लाईव्ह फोटो’ घेऊनच नोंदणी पूर्ण केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे पणन विभागाने स्पष्ट केले आहे. केवळ ‘बीम’ पोर्टलवर झालेली नोंदणीच ग्राह्य धरली जाईल.

भिवंडीत संवर्धनाचा अभाव; कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र देखरेख नाही; नागरिकांमध्ये संताप

बँक खात्याबाबत अत्यंत महत्त्वाची खबरदारी

धान खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, त्यामुळे बँक तपशील भरताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘बीम’ पोर्टलवर बँक खात्याची माहिती अचूक नोंदवली पाहिजे. नोंदणी करताना संबंधित खाते ‘अॅक्टिव्ह’ असल्याची खात्री संस्थेने करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावेच ते बँक खाते असावे. पासबुकमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे नसावीत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊन चुकारे मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Web Title: Relief for farmers in paddy procurement deadline extended for online registration check the rules bhandara news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Bhandara
  • Farmers
  • Marathi News

संबंधित बातम्या

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
1

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
2

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
3

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.