Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत वर्षाअखेर महाराष्ट्रातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, सुरुवातीला ८ तास आणि पुढे १२ तास दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 06:02 PM
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
  • सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार
  • मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Farmers News Marathi : महाराष्ट्र कृषी दिनाचे (Maharashtra Agriculture Day) निमित्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना वर्षभर दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सरकार वेगाने काम करत असून, चालू वर्षाअखेर राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा केला जात आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षाअखेर राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल. यावेळी त्यांनी शेतीसाठी वीजपुरवठ्याचा कालावधीही वाढवण्याची घोषणा केली. सुरुवातीला शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा कालावधी वाढवत १२ तास दिवसा वीजपुरवठा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे

रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अंधार, वन्य प्राण्यांचा धोका, सर्पदंश आणि अपघात यांसारख्या संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना सिंचन करावे लागते. दिवसा वीज उपलब्ध झाल्यास या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि शेतीची उत्पादकता वाढण्यासही मदत होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवसा नियमित आणि पुरेशा कालावधीसाठी वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास सिंचन अधिक सुलभ होईल, उत्पादन खर्चात बचत होईल आणि शेती अधिक सुरक्षित व कार्यक्षम बनण्यास मदत होईल.

बनावट बियाणांना लगाम आणि ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारने आता सर्व प्रकारच्या बियाणांचे प्रमाणीकरण (Seed Certification) डिजिटल संकेतस्थळाच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे. या कडक निर्णयामुळे बाजारपेठेतील बनावट आणि बोगस बियाणांच्या विक्रीला पूर्णपणे बसेल आणि बळीराजाची फसवणूक थांबेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सुकर करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे

Web Title: Cm devendra fadnavis announces 100 percent daytime power supply for farmers news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • agriculture
  • devendra fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
1

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
3

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
4

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.