Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत जोडो यात्रेत काँग्रेसबरोबर जनताही रस्त्यावर उतरल्याने भाजपाचा जळफळाट : नाना पटोले

जनतेचा भारत जोडो पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असून, भारत जोडो यात्रा आता ‘जनयात्रा’ झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2022 | 07:35 PM
भारत जोडो यात्रेत काँग्रेसबरोबर जनताही रस्त्यावर उतरल्याने भाजपाचा जळफळाट : नाना पटोले
Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेला दररोज प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ही पदयात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नसून लोकशाही व संविधान वाचले पाहिजे अशी भावना असलेल्या प्रत्येकाची आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणानंतर महाराष्ट्रात जनतेचा या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असून, भारत जोडो यात्रा आता ‘जनयात्रा’ झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, पट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, जीएसटी, चीनने भारताच्या हद्दीत केलेले अतिक्रमण या देशातील ज्वलंत समस्यांवर केंद्रातील मोदी सरकार गप्प आहे. जनतेच्या समस्या सोडवण्याकडे या सरकारचे लक्ष नसून इतर मुद्दे चर्चेत आणले जात आहे. भाजपा सरकारच्या या नाकर्तेपणावर जनतेमध्ये तीव्र संताप आहे तो संताप, त्यांच्या तीव्र भावना हे लोक भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्याशी व्यक्त करत आहेत. भाजपा सरकारवर जनतेचा प्रचंड रोष असल्याचे या पदयात्रेच्या माध्यमातून समजत आहे. या लोकभावनाच आता भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करतील.

भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भाजपाचे नेते टीका करत आहेत पण या पदयात्रेला मोठे जनसमर्थन देऊन जनताच भाजपाला चोख उत्तर देत आहे. भाजपाच्या टीकेची काँग्रेस पर्वा करत नाही, त्यांच्या टीकेचा पदयात्रेवर काहीही परिणाम होत नाही, उलट जनतेचा दररोज पाठिंबा वाढतच आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे समर्थन केले आहे पण भाजपाच्या काही लोकांचा भारत जोडो यात्रेला मिळणारे समर्थन पाहून जळफळाट होत आहे.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, भारत जोडो यात्रेसाठी प्रदेश काँग्रेसह नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने चोख व्यवस्था करून जिल्ह्यात यात्रा यशस्वीपणे पार पाडली. याआधीही आम्ही काँग्रेस पक्षासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले पण भारत जोडो यात्रेचा अनुभव वेगळाच होता. एवढी मोठी यात्रा व त्याला मिळालेला जनतेचा पाठिंबा अपेक्षेपेक्षाही जास्त होता. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा माझ्यासह अनेकांसाठी एक अविस्मरणीय क्षण आहे.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, AICC च्या माध्यम विभागाच्या महिमा सिंह, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व आदी उपस्थित होते.

Web Title: Bharat jodo yatra bjps backlash as people took to the streets along with congress nana patole nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 07:35 PM

Topics:  

  • ashok chavhan
  • BJP
  • Congress
  • Nana patole
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा
1

“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा

काँग्रेसने ‘शाह’ यांना दिला ‘शह’! तालुका प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश साळवी तर शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती
2

काँग्रेसने ‘शाह’ यांना दिला ‘शह’! तालुका प्रभारी अध्यक्षपदी प्रकाश साळवी तर शहर प्रभारी अध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप
3

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप

Maharashtra political : शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
4

Maharashtra political : शिवसेना उबाठाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.