
राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का (photo Credit- X)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मनोज घरत यांच्यासोबत मनसेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यामुळे डोंबिवलीत मनसेची ताकद कमी झाली असून भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.
मनोज घरत हे डोंबिवली मनसेचा महत्त्वाचा चेहरा मानले जात होते. मात्र, पक्षांतर्गत नाराजी आणि उमेदवारीवरून झालेल्या घडामोडींनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.