
दिलासादायक ! पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय तूर्त नाहीच; फक्त गुरुवारी पुरवठा बंद
सध्या दिवाळी सणानिमित्त गुरूवारी पाणीपुरवठा बंदचा निर्णय तात्पुरता स्थगित केला होता. मात्र, आता येत्या गुरूवारपासून (दि.१९) पुन्हा एकदा आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंदचे नियोजन सुरू होणार आहे. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पुणे महापालिकेने शहरात पाणीपुरवठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. 15 ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पाण्याची नासाडी, चोरी आणि गळती रोखण्यासाठी जाहीर केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात महापालिकेला अपयश आले आहे.
दरम्यान, पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आणि एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीवापरात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली.
यापूर्वीही घेतला होता निर्णय
यापूर्वीही पावसाला विलंब झाल्यामुळे १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर ही कपात मागे घेण्यात आली होती. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याची बचत करण्यासाठी विविध नियम जाहीर केले होते.
१. पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार आहे का?
नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय तूर्त घेण्यात आलेला नाही.
२. सध्या पाणीपुरवठा कधी बंद राहणार आहे?
सध्या आठवड्यातून एकदा, दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
३. गुरुवारचा पाणीपुरवठा बंद कधीपासून पुन्हा सुरू होणार?
येत्या गुरुवार, १९ नोव्हेंबरपासून गुरुवारचा पाणीबंद पुन्हा सुरू होणार आहे.