Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhaskarrao Jadhav On Ajit Pawar: ‘अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच…’; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar Birth Anniversary: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्करराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा झालेला अपघात हा साधा अपघात नसून घातपात होता, असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अजित पवार यांच्या कार्यशैलीचेही त्यांनी कौतुक केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 22, 2026 | 02:43 PM
'अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच...'; भास्करराव जाधवांचा खळबळजनक दावा

'अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच...'; भास्करराव जाधवांचा खळबळजनक दावा

Follow Us
Follow Us:
  • ‘अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच…’
  • भास्करराव जाधवांचा खळबळजनक दावा
  • २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीमध्ये एका चार्टर्ड विमान अपघातात निधन
Bhaskar Jadhav On Ajit Pawar Birth Anniversary: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (22 जुलै ) जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीच्या अपघाताबाबत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. जाधव यांनी, “अजितदादांच्या गाडीचा झालेला अपघात हा साधा अपघात नव्हता, तर तो घातपात होता,” असा दावा केला.

या वक्तव्यामुळे त्या अपघाताबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, राजकीय वर्तुळात या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जाधव यांनी या दाव्याबाबत अधिक तपशील किंवा कोणतेही पुरावे सार्वजनिकरीत्या मांडले नाहीत.

Ratnagiri Politics : ‘सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे…’; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

यावेळी बोलताना भास्करराव जाधव यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्यशैलीचेही भरभरून कौतुक केले. “अजितदादा म्हणजे कठोर शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि निर्मळ मनाचा राजा माणूस आहेत. त्यांनी प्रशासनात आणि राजकारणात काम करण्याची वेगळी कार्यपद्धती निर्माण केली आहे,” असे ते म्हणाले. तसेच, अजित पवार यांची निर्णयक्षमता, कामातील वेग आणि प्रशासनावरील पकड यांचा उल्लेख करत अनेक कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्थान असल्याचेही जाधव यांनी सांगितले. दरम्यान, “अपघात नव्हे, घातपात” या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या वक्तव्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीमध्ये एका चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. त्यावेळी रोहित पवार यांनी या अपघाताला एक मोठे षडयंत्र म्हटले असून, या प्रकरणाची सखोल आंतरराष्ट्रीय किंवा सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Devkhel Web Series: ‘देवखेळ’ वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणी, आमदार भास्कर जाधव आक्रमक; संकासूराच्या चित्रणावरून कोकणात रोष

Web Title: Bhaskarrao jadhav claims ajit pawar car accident was sabotage not an accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Bhaskar Jadhav
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट
1

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती
2

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती

CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट
3

CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण
4

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.