Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद विकोपाला; दुरुस्ती की स्थलांतराचा डाव? मनसेचा प्रशासनावर सणसणीत आरोप

Bhayander News : शहराच्या प्रवेशद्वारावर काशिमीरा चौकात गेल्या तीन दशकांपासून उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थलांतरित करण्याच्या चर्चेमुळे शहरात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 07, 2026 | 01:09 PM
Bhayander News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद विकोपाला; दुरुस्ती की स्थलांतराचा डाव? मनसेचा प्रशासनावर सणसणीत आरोप
Follow Us
Follow Us:
  • शिवरायांच्या पुतळ्याचा वाद विकोपाला
  • दुरुस्ती की स्थलांतराचा डाव? मनसेचा प्रशासनावर सणसणीत आरोप
भाईंदर/विजय काते : मिरा-भाईंदर शहराच्या प्रवेशद्वारावर काशिमीरा चौकात गेल्या तीन दशकांपासून उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थलांतरित करण्याच्या चर्चेमुळे शहरात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर शिवप्रेमींसह विविध राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.काशिमीरा चौकातील हा पुतळा शहराच्या ओळखीचे प्रतीक मानला जातो. चौकाच्या मध्यभागी उभारलेला हा ऐतिहासिक पुतळा अनेक वर्षांपासून शिवप्रेमींसाठी श्रद्धास्थान राहिला आहे. मात्र, मागील काही वर्षांत शहरात मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल आणि रस्ते विस्ताराची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू झाल्याने चौकाचे स्वरूप बदलले आहे. याच पार्श्वभूमीवर पुतळ्याच्या दुरुस्ती आणि संभाव्य स्थलांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पूर्वीही पुतळा हटवण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर शिवप्रेमींनी जोरदार विरोध केला होता. त्यानंतर प्रशासनाने पुतळ्याभोवतीच मेट्रो आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. शहराची ओळख कायम राहावी यासाठी घोडबंदर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आणि त्याचे लोकार्पणही करण्यात आले होते.दरम्यान, काशिमीरा परिसरात नुकतीच मेट्रो सेवा सुरू झाली असून उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या बांधकामांमुळे मूळ पुतळा पूर्वीसारखा स्पष्ट दिसत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे पुतळ्याच्या दुरुस्तीबाबत आणि पुढील निर्णयासाठी हा विषय महापालिकेच्या महासभेत चर्चेसाठी मांडण्यात आला.

Mira Bhayander : अतिक्रमण झालेल्या झोपड्यांना भीषण आग; निष्काळजीपणामुळे महानगरपालिकेवर टीकेची झोड

मिळालेल्या माहितीनुसार, पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ सल्लागार आणि मूर्तिकार नेमण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, दुरुस्तीच्या काळात पुतळा हटवल्यानंतर तो पुन्हा मूळ ठिकाणी बसविण्यात येणार की अन्यत्र स्थलांतरित केला जाणार, याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याच अनिश्चिततेमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर टीका करत, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ शिल्प नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. कोणताही निर्णय घेताना शिवप्रेमींची भावना विचारात घेतली गेली पाहिजे. अन्यथा शहरात तीव्र आंदोलन उभे केले जाईल,” असा इशारा दिला आहे.+या मुद्द्यावरून आता शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत शिवप्रेमी संघटना, सामाजिक संस्था आणि विविध पक्षांकडून आंदोलनाची भूमिका अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bhayander News : कोस्टल रोड बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना; गॅन्ट्री क्रेनचा प्लॅटफॉर्म कोसळल्याने कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

 

Web Title: Bhayander news shivaji statue controversy escalates repair or relocation plan mns makes scathing allegations against the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • MNS
  • Thane news

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप
2

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
3

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
4

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.