Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: वय फक्त आकडा! एरंडोलमध्ये २ हजार आजी-आजोबांची साक्षरता परीक्षा, ३० जण गैरहजर

Jalgaon News: केंद्र शासनाच्या ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’अंतर्गत एरंडोल तालुक्यात २५ ऑक्टोबर रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन परीक्षा घेण्यात आली. तालुक्यातील ९० परीक्षा केंद्रांवर एकूण २,१७६ नोंदणीकृत परीक्षार्थींपैकी २,१४६ जणांनी परीक्षा दिली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 27, 2026 | 03:32 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एरंडोलमध्ये २,१४६ जणांनी साक्षरता परीक्षा दिली.
  • परीक्षेत १,३६४ महिला आणि ७८२ पुरुषांचा सहभाग.
  • ९० केंद्रांवर परीक्षा; ३० परीक्षार्थी गैरहजर.

एरंडोल (वा.) देशातील १५ वर्षे व त्यावरील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ अंतर्गत एरंडोल तालुक्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील ९० परीक्षा केंद्रांवर २ हजार १४६ आजी-आजोबांनी परीक्षा दिली.Jalgaon News:

शिक्षणाला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मर्यादा नसतात हे परीक्षार्थीनी सिद्ध करून दाखवले आहे. यात १ हजार ३६४ स्त्रिया व ७८२ पुरुषांनी परीक्षा दिली. तर ३० आजी आजोबा गैरहजर राहिले.

Dhule Accident News: धुळ्यात काळाचा घाला! न्यायालयीन काम आटोपून परतणाऱ्या दोन चुलत भावांचा भीषण अपघातात मृत्यू

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने नियोजन…

जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आणि गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर चोख नियोजन करण्यात आले होते. या यशस्वी आयोजनासाठी एरंडोल तालुका समन्वयक एल. आर. पाटील आणि सर्व शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.

परीक्षा देण्यासाठी महिलांचीच अधिक संख्या…

या परीक्षेसाठी एकूण नोंदणीकृत परीक्षार्थी २ हजार १७६ असून १ हजार ३७४ महिला व ८०२ पुरुष परिक्षार्थीचा समावेश आहेत. सदर परीक्षा एकूण १०० गुणांची असून वाचन-लेखन आणि संख्याज्ञान या दोन घटकांवर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात किमान ३३% गुण म्हणजेच १८ गुण मिळवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे गैरहजर राहिलेल्या ३० आजी-आजोबांना भविष्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

Shalarth ID Scam : अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; पगार रोखण्यासह मान्यता रद्द करण्याच्या हालचाली

अभियानात जीवनोपयोगी घटकांवरही भर…

  • उल्लास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत केवळ वाचन, लेखन आणि मूलभूत गणिती क्रियांचे ज्ञान दिले जात नसून, पुढील महत्त्वाच्या जीवनोपयोगी घटकांवरही भर दिला जात आहे.
  • बैंकिंग व्यवहार आणि डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर करणे.
  • दैनंदिन आरोग्याची काळजी व स्वच्छताविषयक जाणिवा
  • शासकीय योजनांची माहिती समजून घेणे आणि स्वतः चे हक्क जाणणे.
  • पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणे. अपूर्ण शिक्षण राहिलेल्या नागरिकांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे दैनदिन व्यवहार अधिक आत्मविश्वासाने पार पाडण्यासाठी हा उपक्रम एरंडोल तालुक्यात अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Erandol 2146 adults appear for ullas nav bharat literacy exam rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Maharshtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur Crime : शेंगांचा ठेला ते एमडीचा धंदा; ३०० रुपये रोज कमावणारा ‘फल्ली’ कसा बनला कोट्यधीश
1

Nagpur Crime : शेंगांचा ठेला ते एमडीचा धंदा; ३०० रुपये रोज कमावणारा ‘फल्ली’ कसा बनला कोट्यधीश

Dadar Kabutarkhana Controversy: कबुतरखाना हवा की आरोग्याची काळजी? नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
2

Dadar Kabutarkhana Controversy: कबुतरखाना हवा की आरोग्याची काळजी? नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला धणे पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि योग्य विधी
3

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला धणे पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि योग्य विधी

Skills on Wheels Initiative: कौशल्य शिक्षण आता थेट शाळेच्या दारात! ‘हा’ अभिनव उपक्रम ठरतोय विद्यार्थ्यांसाठी वरदान
4

Skills on Wheels Initiative: कौशल्य शिक्षण आता थेट शाळेच्या दारात! ‘हा’ अभिनव उपक्रम ठरतोय विद्यार्थ्यांसाठी वरदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.