Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशाच्या उत्तम नेत्यांमध्ये भुजबळांचा उल्लेख करावाच लागेल – शरद पवार

आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर लगेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिवाजीपार्कवर मेळावा देखील पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वाटचालीत त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. कोणतेही काम हाती घेतलं की ते उत्तम व नेटकं करायचे ही छगन भुजबळ यांची खासियत या शब्दात त्यांनी भुजबळांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. 

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 13, 2022 | 07:28 PM
देशाच्या उत्तम नेत्यांमध्ये भुजबळांचा उल्लेख करावाच लागेल – शरद पवार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दिल्लीतील सर्वात उत्तम निवासस्थान हे महाराष्ट्र सदन आहे. दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणारे हे महाराष्ट्र सदनाचे काम छगन भुजबळ यांनी केलं. असचं काम त्यांनी महाराष्ट्र, मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात उभं केलं. कुठल्याही कामचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ याचं नेतृत्व शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांनी अनेक खस्ता खाल्या. शिवसेनेचे नेतृत्व, नगरसेवक, पहिले आमदार, महापौर होत मुंबईचे नेतृत्व त्यांनी केले. पायाभूत विकास केला. पुढे विधानसभा, विरोधी पक्षनेता, मंत्री म्हणून काम करताना विकासाला दिशा देण्याचे आगळे वेगळे काम केले. देशात विकास करणारा उत्तम राजकारणी नेते म्हणून भुजबळांचा उल्लेख करावा लागेल या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा गौरव केला.

[read_also content=”एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/allotment-midc-plots-ambadas-danve-written-letter-to-cm-335910.html”]

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने मुंबईतील ‘षण्मुखानंद’ सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.शरद पवार हे बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘बहुजनांचा नायक छगन भुजबळ’’ व फोटोबायग्राफीचे पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खा.डॉ.फारुख अब्दुल्ला, माजी राज्यसभा सदस्य प्रज्ञावंत साहित्यिक डॉ.जावेद अख्तर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, गौरव समितीचे खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार कपिल पाटील, आमदार सचिन अहिर,राजेश टोपे,माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, डीएमकेचे आली शेख मिरान, माजी खासदार राजकुमार सैनी, मोतीलाल साखला, समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बहुजनांचा नायक छगन भुजबळ’ पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान, विजय सामंत प्रकाशक अरविंद शाह यांच्यासह कुटुंबातील सदस्य व देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार म्हणाले की,  आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर लगेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिवाजीपार्कवर मेळावा देखील पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वाटचालीत त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. कोणतेही काम हाती घेतलं की ते उत्तम व नेटकं करायचे ही छगन भुजबळ यांची खासियत या शब्दात त्यांनी भुजबळांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.

ते म्हणाले की,  छगन भुजबळ हे माझे ज्येष्ठ सहकारी असून त्यांची ६१ वी व आता अमृतमहोत्सला उपस्थित आहे. मी त्यांच्या कायम पाठिशी आहे. देशात सावित्रीबाई, महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम भुजबळ करत आहे. मी ज्या पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला फुले यांचे नाव भुजबळांमुळे मिळाले याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. तसेच देशात काश्मीर राहण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांच्या वडिलांचे योगदान अतिशय महत्वाचे राहिले. देशात एकात्मता टिकविण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांनी केले. ते आज छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहिले हा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Bhujbal must be mentioned among the best leaders of the country sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 07:28 PM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • Mumbai
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
2

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.