Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणासाठी मुलांना करावी लागत होती पायपीट; सायकल देत दिलीप भोईर चॅरिटेबल ट्रस्टने जपली बांधीलकी

झिराड व परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलो मीटरची पायपीट करावी लागत होती. मात्र हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 12, 2025 | 05:14 PM
शिक्षणासाठी मुलांना करावी लागत होती पायपीट

शिक्षणासाठी मुलांना करावी लागत होती पायपीट

Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग : दिलीप उर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शंभरहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना शनिवारी (12 एप्रिल) रोजी मोफत सायकल देण्यात आल्या. दिलीप भोईर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. झिराड व परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलो मीटरची पायपीट करावी लागत होती. मात्र हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळणार आहे. परिषद माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या उपक्रमामुळे शिक्षणाच्या मार्गाला गती मिळाली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात वाहतूक बदल; काय आहेत पर्यायी मार्ग?

ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून शाळा- महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल हे गतीचे प्रतिक आहे. हे जाणून ग्रामीण भागातील गरीब व गरजू मूली व मुलांना सामाजिक बांधिलकीतून सायकलदेण्याचे काम दिलीप भोईर यांनी चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केले. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होण्यास चालना मिळाली आहे.

विद्यार्थ्यांच्या चेहरे फुले

सामाजिक बांधिलकी जपत दिलीप भोईर यांच्या प्रयत्नाने झिराड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम शनिवारी झिराडमधील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात राबविण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर एक वेगळा आनंद निर्माण झाला होता. सायकली मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.

शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न – दिलीप भोईर

आठवीपासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी घरापासून तीन किलो मीटरचा प्रवास करावा लागत होता. त्यांच्या शिक्षणाची दारे खुली व्हावीत, म्हणून विद्यार्थ्यांसाठी मोफत मिनीडोअरची व्यवस्था करण्यात आली. शाळा ते घर असा सुरक्षीत प्रवास विद्यार्थ्यांसाठी केला होता. जनतेची सेवा करण्यासाठी चॅरीटेबल ट्रस्ट सुरु केली. या ट्रस्टच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्याची संकल्पना आखली. संस्थेच्या माध्यमातून सायकल वाटप करण्याचा पहिला उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे, असे दिलीप उर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी सांगितले.

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार? विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ ३० एप्रिलपर्यंत, ‘लेडी सुपरकॉप’चे नाव शर्यतीत

Web Title: Bicycle support for students in zirad dilip bhoir charitable trust keeps its commitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • Alibaug
  • bicycle
  • Student

संबंधित बातम्या

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू
1

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश
2

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश

Raigad News : “मतदार चोर, खुर्ची सोड” ; मतदार चोरीविरोधात काँग्रेसचा कॅन्डल मार्च
3

Raigad News : “मतदार चोर, खुर्ची सोड” ; मतदार चोरीविरोधात काँग्रेसचा कॅन्डल मार्च

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन
4

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.