Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्…, नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना

रस्त्यात लटकणाऱ्या नायलॉनमांजामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना समोर आली. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथे घडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 29, 2025 | 12:29 PM
धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्..., नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना

धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्..., नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना

Follow Us
Close
Follow Us:
  • धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला
  • नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी
  • कसबे सुकेणे येथील घटना
नाशिक: निषिद्ध असलेल्या नायलॉन मांजामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता, मात्र नशीब बलवत्तर म्हणून तो थोडक्यात बचावला. नाशिक कसबे सुकेणे येथील बसस्थानकाजवळ शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकीस्वार भाऊराव हिलम (३२, रा. बरड वस्ती, ओणे) यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

भाऊराव हिलम हे ओणे येथील बरड यस्तीवर शेतमजुरी करतात. शनिवारी सायंकाळी ते कसबे सुकेणे रेल्वेस्थानक परिसरातील पेट्रोल पंपावरून दुचाकीने घरी परतत होते. बसस्थानकाजवळ अचानक धारदार नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. हिलम यांनी प्रसंगावधान राखून हाताने मांजा बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मांजाने गळ्याला खोलवर जखम केली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हिलम यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉ. किरण देशमुख यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार करून गळ्याला पाच टाके घातले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Nashik Child Skeleton Found: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! हरवलेल्या लेकाचा जंगलात सापडला सांगाडा; चप्पल पाहून आईचा आक्रोश

नागरिकांमध्ये संताप

नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची छुप्या पद्धतीने विकी सुरू असल्याने अशा घटना घडत आहेत, प्रशासनाने केवळ कागदोपत्री बंदी न घालता मांजा विक्रेत्यांसह वापरणान्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कसबे सुकेणे परिसरातील नागरिकांनी केली आहे. दुचाकी चालवताना गळ्याला मफलर किंवा संरक्षक पट्टा वापरावा आणि वेग मर्यादित ठेवावा, जेणेकरून अशा संकटांपासून बचाव होऊ शकेल.

नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ

मी माझ्या अंतरात्म्याला स्मरून अशी शपथ घेतो-घेते की, पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे पक्षी व माणसाच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने यापुढे मी नायलॉन मांजा वापरणार नाही. याची ग्वाही देती-देते. तसेच, कोणी वापरताना दिसल्यास त्यांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगून ती वापरण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन.

‘उडान’ करणार २० हजार विद्यार्थ्यांची जनजागृती

नायलॉन मांजामुळे दरवर्षी होणाऱ्या अपघातांबद्दल गंभीर वास्तवाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण काची, यासाठी उडान फाऊंडेशनतर्फ सिन्नरमधील शाळांमध्ये जाऊन नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगत मांजा न वापरण्याची शपय देण्याचा अभिनव उपक्रम राबविला. दिवसेंदिवस या मांजाचा वापर वाढत असून, त्याचा पेट फटका दुचाकीस्वारांना बसत आहे. काहीचा दुर्दैवी मृत्यूही होती. या पाश्र्वभूमीवर जनजागृतीसाठी फाऊंडेशनने तालुक्यातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्याव्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासह तो न वापरण्याची सामूहिक शपथ देण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्याव्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिक्षक व शाळा व्यवस्थापनानेही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. भविष्यात ही चळवळ उज्युक्त ठरणार असल्याचा विश्वास उड़ानचे संस्थाइक अध्यक्ष भरत शिंदे यानी व्यक्त केला.

एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक

Web Title: Bike rider injured due to nylon manja incident in kasbe sukne area nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Nylon Manja

संबंधित बातम्या

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
1

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर
2

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव
4

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.