Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: फडणवीसांचा ‘हा’ फॉर्म्युला ठरणार भाजपसाठी बूस्टर; रणनीती पाहून विरोधकही चक्रावले

शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डांनी रवींद्र चव्हाण यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2025 | 03:18 PM
Maharashtra Politics: फडणवीसांचा 'हा' फॉर्म्युला भाजपसाठी ठरणार बूस्टर; रणनीती पाहून विरोधकही चक्रावले

Maharashtra Politics: फडणवीसांचा 'हा' फॉर्म्युला भाजपसाठी ठरणार बूस्टर; रणनीती पाहून विरोधकही चक्रावले

Follow Us
Follow Us:

मुंबई: राज्यात मागच्या वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. खास करून भाजपने 132 जागा जिंकत राज्यातील एक नंबरचा पक्ष होण्याचा मान प्राप्त केला. महायुतीच्या आणि भाजपच्या विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाचा वाटा मोठा आहे. या विजायनांतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील आणि केंद्रात नेत्यांसामोर वजन वाढले आहे.

दरम्यान विधानसभेतील विजयानंतर आता भाजप आणि महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. खास करून भाजपने राज्यातील सर्व समाजास जोडण्यासाठी एक रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे. या फॉर्म्युलामुळे विरोधक देखील आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने राज्यात कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे हेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले जाईल अशी शक्यता होती. मात्र सध्या बावनकुळेच प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. रवींद्र चव्हाण हे माजी मंत्री राहिले आहेत. मात्र भाजपने राज्यात एक नवीन राजकीय समीकरण बांधल्याचे म्हटले जात आहे. ते काय आहे ते जाणून घेऊयात.

या मागची राजकीय गणिते काय?

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही संपलेला नाहीये. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले होते. लोकसभा निवडणुकीत आंदोलनाचा फटका महायुती न भाजपला बसल्याचे म्हटले जात होते. मात्र विधानसभेत तसे काही जाणवले नाही. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जातीय समीकरण साधल्याचे म्हटले जात आहे.

रवींद्र चव्हाण याना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करून भारतीय जनता पक्षाने राज्यातील मराठा समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे.  लोकसभा निवडणुकीदरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या समुदायाने भाजपपासून, विशेषतः देवेंद्र फडणवीसांपासून स्वतःला दूर केले होते. परंतु संघाच्या प्रयत्नांमुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. लोकसभेत बसलेला फटका विधानसभेत बसताना दिसून आला नाही.

हेही वाचा: Local Body Elections: कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका..? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

भाजपने राज्यात कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करून राज्यातील ब्राह्मण, मराठा आणि ओबीसी समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः ब्राह्मण समाजातून येतात. चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजातून तर रवींद्र चव्हाण हे मराठा समाजातून येतात. दरम्यान भाजपने हे जातीय समीकरण साधून आगामी निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. मात्र या रणनीतीनुसार भाजप आणि महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Bjp and devendra fadnavis brahmin maratha and obc formula for maharashtra politcs ravindra chvhan and chandrshkehar bawankule for election shirdi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
4

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.