Photo Credit- Social Media स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांकडे लागले आहे. यावेळी कोणत्याही किंमतीत सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता मिळवायचीच, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीने तयारीला सुरूवातही केली आहे. पण निवडणुका नेमक्या कधी होणार, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. अशातच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य केलं आहे.
येत्या तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शनिवारी (21 डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले.
Bihar Politics: तर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार….? नितीश कुमारांच्या गोटात हालचालींना वेग
मागील तीन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. मात्र 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी 4 जानेवारीला होऊ शकते, असे फडणवीस यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर येत्या तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
फडणवीस म्हणाले की, विधानसभेतील नेत्रदीपक विजयानंतर लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, सरकार आणि जनता यांच्यात समन्वय ठेवण्याची जबाबदारी पक्षाची आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयाने पक्ष आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सध्या राज्यात भाजपसाठी पोषक वातावरण आहे. याचा फायदा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा पक्षाचा डाव आहे. याअंतर्गत नवनियुक्त मंत्री आणि नवनिर्वाचित आमदारांच्या मदतीने पक्ष कार्यकर्ता परिषदा आणि सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे.
रुक्मिणी अष्टमीच्या दिवशी या पद्धतीने करा पूजा, जाणून घ्या पूजा साहित्य आणि महत्त्व