Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती पोलिसांची धडक; गावठी पिस्तूल, तीन काडतुसे अन् कार जप्त!

Baramati Crime: प्राथमिक चौकशीत हे शस्त्र मयूर मोरे (रा. मेडद, ता. बारामती) याच्याकडून मिळाल्याचे आदित्य शेलार याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. शस्त्राचा मूळ स्रोत आणि संभाव्य बेकायदेशीर पुरवठ्याबाबत पुढील तपास सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 23, 2026 | 12:26 PM
Baramati, Pune News, Crime News, Baramati Crime, Illegal Weapons

Baramati, Pune News, Crime News, Baramati Crime, Illegal Weapons

Follow Us
Follow Us:
  • बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई
  • आमराईतील आदित्य शेलार या तरुणाकडून २५ हजारांचे गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे जप्त
  • १,२०० रुपयांची तीन काडतुसे आणि दोन लाख रुपये किमतीची कार जप्त
Baramati Crime News:  मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती शहर पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि मारुती स्विफ्ट कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आमराई, बारामती येथील आदित्य शेलार याला अटक करण्यात आली आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टी. सी. कॉलेज परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र

२२ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय माहिती मिळाली. आदित्य शेलार हा लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून टी. सी. कॉलेज परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.

India China Tension: अरुणाचल प्रदेश सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष; ITBP प्रमुखांचा मोठा खुलासा

मोरया पॅलेस इमारतीसमोरील रस्त्यावर संशयित कार

प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास आठ नंबर ग्राउंडजवळील मोरया पॅलेस इमारतीसमोरील रस्त्यावर संशयित कार शोधून काढली. दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची तपासणी केली असता चालकाच्या सीटजवळ गावठी पिस्तूल आणि मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस आढळले. त्यानंतर शेलार याची अंगझडती घेतली असता जॅकेटच्या खिशात आणखी दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा वैध परवाना नसल्याचेही समोर आले.

पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल, १,२०० रुपयांची तीन काडतुसे आणि दोन लाख रुपये किमतीची कार जप्त केली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७३/२०२६ नुसार भारतीय हत्यार अधिनियम, १९५९ च्या कलम ३ सह २५(१-ब)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

शस्त्राचा पुरवठादार कोण?

प्राथमिक चौकशीत हे शस्त्र मयूर मोरे (रा. मेडद, ता. बारामती) याच्याकडून मिळाल्याचे आदित्य शेलार याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. शस्त्राचा मूळ स्रोत आणि संभाव्य बेकायदेशीर पुरवठ्याबाबत पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयातून पोलीस हवालदार क्षीरसागर, पोलीस शिपाई कवितके, अक्षय सिताफ आणि पोलीस हवालदार अभिजीत कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव विष्णू क्षीरसागर करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बारामतीत पोलिसांनी कधी आणि काय कारवाई केली?

    Ans: २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास टी. सी. कॉलेज परिसरात पोलिसांनी मारुती स्विफ्ट कारमधून फिरणाऱ्या आदित्य शेलारला गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसांसह अटक केली.

  • Que: जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत किती आहे?

    Ans: पोलिसांनी २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तूल, १,२०० रुपयांची तीन काडतुसे आणि २ लाख रुपयांची कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • Que: आरोपीवर कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: आरोपी आदित्य शेलारवर बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम (Arms Act), १९५९ च्या कलम ३ सह २५(१-ब)(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • Que:

    Ans:

Web Title: Baramati police seize country made pistol live cartridges car aditya shelar arrested as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
1

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
2

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह
3

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह

Automobile: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ब्रेक! पुण्यात वाहननोंदणीत ‘इतकी’ घट; इलेक्ट्रिक वाहनांची…
4

Automobile: दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला ब्रेक! पुण्यात वाहननोंदणीत ‘इतकी’ घट; इलेक्ट्रिक वाहनांची…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.