Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दोन हाणा, पण मला बाजीराव म्हणा, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था; भाजप नेत्याची बोचरी टीका

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार प्रचार करत आहे. मात्र दोन्ही युतींकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत उत्सुकता लागली आहे. भाजन नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 17, 2024 | 02:49 PM
'एकीच्याही केसाला धक्का लागला तर..' ; उद्धव ठाकरेंनी थेट कोल्हापूरच्या 'मुन्ना'ला भरला दम

'एकीच्याही केसाला धक्का लागला तर..' ; उद्धव ठाकरेंनी थेट कोल्हापूरच्या 'मुन्ना'ला भरला दम

Follow Us
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी राज्यामध्ये वातावरण निर्मिती केली जात आहे. बैठका, दौरे आणि सभा यांचे सत्र वाढले आहेत. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख अनेकदा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान, महामेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कोणीही मुख्यमंत्री झाला तरी माझा पूर्ण पाठिंबा असेल असे वक्तव्य केले. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची?

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महायुतीकडून उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष्य केले जाते.  लोकसभा निवडणूकीमध्ये देखील शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर बाजप नेत्यांनी आगपाखड केली होती. त्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणूकीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार की नाही यावरुन भाजपने निशाणा साधला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपाने असंख्य शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीचे महत्त्व कमी करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची? याची परिसीमा त्यांनी ओलांडली आहे. असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला आहे.

प्रचाराची रणधुमाळी सुरु

मुख्यमंत्री पदावरुन ‘दोन हाणा, पण मला बाजीराव म्हणा’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली असल्याचा घणाघात प्रसाद लाड यांनी केला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. महाविकास आघाडीने महामेळावा घेतला आहे. त्याचप्रमाणे भाजपाने देखील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतलेला आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महायुतीकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर येणारी की महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी देणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे.

Web Title: Bjp leader prasad lad targeted uddhav thackeray from the post of chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 02:49 PM

Topics:  

  • Prasad Lad
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा
1

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती
2

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.