Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनेक मंडळी येतात अन् गप्पा मारतात, आश्वासने देणाऱ्यांना आता…; रवींद्र चव्हाणांची शिवतारेंवर सडकून टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार विजय शिवतारे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. सासवड स्मार्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 05:43 PM
अनेक मंडळी येतात अन् गप्पा मारतात, आश्वासने देणाऱ्यांना आता...; रवींद्र चव्हाणांची शिवतारेंवर सडकून टीका

अनेक मंडळी येतात अन् गप्पा मारतात, आश्वासने देणाऱ्यांना आता...; रवींद्र चव्हाणांची शिवतारेंवर सडकून टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेक मंडळी येतात अन् गप्पा मारतात
  • आश्वासने देणाऱ्यांना आता उभे करु नका
  • रवींद्र चव्हाणांची शिवतारेंवर सडकून टीका
सासवड : सध्या निवडणुकीचा काळ आहे आणि अनेक मंडळी येतात गप्पा मारतात, ती राजकारणी आहेत त्यांना आश्वासन द्यायची असतात, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांना अजिबात उभे करू नका. वसुदैव कुटुंबंम या प्रेरणेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप केवळ देशात नाही तर संपूर्ण जगात काम करीत आहेत. काही मंडळी निवडणुकीच्या काळात फक्त आश्वासन देतील; मात्र काम काहीच करणार नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार विजय शिवतारे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. सासवड स्मार्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निमित्त भाजप उमेदवारांच्या प्रचारानिमित्त रवींद्र चव्हाण यांनी सासवडमध्ये रोड शो केला. त्यानंतर धान्य बाजार मध्ये झालेल्या जाहीर सभेत आमदार विजय शिवतारे यांच्यावर विविध प्रश्नांवरून जोरदार तोफ डागली. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार संजय जगताप, आमदार योगेश टिळेकर, अशोक टेकवडे, दौलत शितोळे, मार्तंड भोंडे, दिलीप गिरमे, गणेश जगताप, शेखर वढणे, आनंद जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जगतापांनी घेतला शिवतारेंचा समाचार

माजी आमदार संजय जगताप यांनी आमदार विजय शिवतारे यांचा जोरदार समाचार घेतला. आपण मंत्री होता, सरकार होते. मात्र, सासवडला निधी देताना कायम सापत्न भावाची वागणूक दिल्याचा आरोप केला. आम्ही स्वच्छतेतून पुरस्कार मिळवला. वीरची पाणी योजना आम्हीच नव्याने केली. मात्र, त्यांनी जाणून बुजून दोन वर्षे वर्क ऑर्डर काढली नाही. नंतर आचारसंहिता लागली. आणि त्याचे श्रेय तुम्ही घेता? यापूर्वी सासवडला नियमित पाणी मिळत होते.

पदे मिळल्यावर कामे करा

कचरा गाडी वेळेवर येत होती, मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक सासवड घाण करण्याचे काम केले. मागील तीन चार महिन्यात ज्यांनी सासवडचे नियोजन बिघडवले ते आपल्यासमोर उभे आहेत. आम्हाला नगरसेवक पदाची बिरुदावली मिरवायची नाही तर लोकांची कामे करायची आहेत. मात्र, काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे, अशा शब्दात नाव न घेता विजय शिवतारे यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले.

झोपडपट्टी मुक्त सासवड करायचे

पिंपळे येथे दोन कोटी आणि वाघ डोंगर येथे दोन कोटी लिटर पाण्याचा साठवण तलाव करणार आहे. सासवडमधील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार आहेत. सर्व विजेच्या तारा अंडर ग्राउंड करणार आहे. सध्या सात मजलेपर्यंत बांधकाम करण्याची परवानगी असून, आगामी काळात विमानतळ प्रकल्प होत आहे. १०, ११ मजलेपर्यंत बांधकाम करता येणार आहे. आम्हाला झोपडपट्टी मुक्त सासवड करायचे आहे. प्रत्येक व्यक्तीला पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल द्यायचे आहे. असे आश्वासन संजय जगताप यांनी यावेळी दिले.

Web Title: Bjp leader ravindra chavan has harshly criticized shiv sena leader vijay shivtare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • BJP
  • Saswad
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…
1

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा
2

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण
3

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…
4

Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.