Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhaskar Jadhav: जाधवांचा ‘ब्राह्मण’वार अन् कोकणात धुमशान; ‘त्या’ वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. जाधवांच्या विधानाने गुहागरच्या ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 12, 2025 | 09:48 PM
Bhaskar Jadhav: जाधवांचा 'ब्राह्मण'वार अन् कोकणात धुमशान; 'त्या' वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

Bhaskar Jadhav: जाधवांचा 'ब्राह्मण'वार अन् कोकणात धुमशान; 'त्या' वक्तव्याला विनय नातूंचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

१. भास्कर जाधवांच्या विधानाने राजकारण तापले
२. गुहागरात ब्राह्मण समाज आक्रमक
३. विनय नातूंचे जाधवांना प्रत्युत्तर

Vinay Natu: राज्याच्या राजकारणात भास्कर जाधव यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. “ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. आज मी जे बोलतोय, त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही,” अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल केला आहे. भास्कर जाधव यांच्या विधानानंतर आता राज्यातील वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. गुहागर भाजपचे नेते डॉ. विनय नातू यांनी भास्कर जाधवांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?

गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. त्यातच सोमवारी मुंबईत पार पडलेले्या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण संघाचे गुहागर तालुकाध्यक्ष धनशाम जोशी यांना बेडकाची उपमा देत चांगलीच आगपाखड केली. मला पराभूत कऱण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजाला माझ्या विरोधात भडकावलं. वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला, त्यातही माझे नाव घेण्यात आले. ठाण्यातील त्या नेत्यालाही मी सोडणार नाही. घनशाम जोशींनी पक्ष म्हणून पत्र लिहायला पाहिजे होतं. पण त्यांनी समाज म्हणून पत्र लिहीलं याचं वाईट वाटलं.

Bhaskar Jadhav News: ‘ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात….’; ब्राह्मण सहाय्यक संघावर भास्कर जाधव इतके का चिडले?

भाषणात जाधव म्हणाले, “मला आज तुमच्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मी जर आता बोललो नाही तर भविष्यात काळ अडचणीचा ठरू शकतो. माझी निवडणूक नुकतीच झाली आहे, त्यामुळे चार वर्षे मला काही अडचण नाही. अनेक जण मला सोडून गेले, काहींनी माझा फायदा घेतला, पण मी काही बोललो नाही. यामुळे त्यांना वाटू लागले की हा काहीच करू शकत नाही. मात्र, आतापर्यंत मी गप्प बसलो होतो, पण आता मी कोणालाही सोडणार नाही.”

भाजप नेते विनय नातूंचे प्रत्युत्तर

अजून आमचे सैनिक तसेच जागेवर आहेत, हे दाखवण्यासाठी सभेत केलेलं हे वक्तव्य आहे. त्यामुळे ही राजकीय सभा होती. या राजकीय सभेमध्ये खोत, ब्राह्मण या सर्व विषयांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. कोणत्याच पत्रात माफी मागण्याचा विषय आला नाहीये.

Web Title: Bjp leader vinay natu reply to bhaskar jadhav brahmin community statement guhagar maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 09:41 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • Kokan News
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
3

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
4

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.