Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indapur Politics: ‘धरणाला भोक पाडणारेच आता निस्ताराचे बोल करतायत’; गारटकर-माने यांचा आजी-माजी मंत्र्यांवर घणाघात

प्रविण माने यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे सांगितले. खडकवासला कालव्यातून सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक भाग कोरडे पडले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 27, 2026 | 05:47 PM
Indapur Politics: ‘धरणाला भोक पाडणारेच आता निस्ताराचे बोल करतायत’; गारटकर-माने यांचा आजी-माजी मंत्र्यांवर घणाघात
Follow Us
Follow Us:
  • इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली पाणीटंचाई
  • प्रदीप गारटकर आणि प्रविण माने यांनी तालुक्यातील पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना थेट जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल
  • सत्ता आणि समिती दोन्ही तुमच्या हातात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेमके काय केले?
Indapur News: इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली पाणीटंचाई, कोरडे पडलेले कालवे, रखडलेले पाणी नियोजन आणि धोक्यात आलेली शेती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षातील आजी-माजी मंत्र्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी ( २६ मे ) झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते प्रदीप गारटकर आणि प्रविण माने यांनी तालुक्यातील पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना थेट जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला.

“धरणाला भोक पाडण्याची वेळ ज्यांनी आणली, तेच आता निस्ताराचे बोल करत आहेत,” अशा शब्दांत प्रदीप गारटकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. १९९५-९६ मध्ये उजनी धरणातून पाणी उचलून शेटफळगढे परिसरात आणण्याची योजना मंजूर झाली होती. ही योजना पूर्ण झाली असती तर तालुक्यातील ६५ गावांचा पाणीप्रश्न कायमचा मिटला असता; मात्र राजकारण, विरोध आणि स्वार्थी भूमिकेमुळे ही योजना जाणीवपूर्वक बारगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Civic Issues: चाकण-आळंदी रस्त्यावरील वनक्षेत्रात कचऱ्याचे साम्राज्य! वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणासह वन्यजीव धोक्यात

प्रविण माने यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे सांगितले. खडकवासला कालव्यातून सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक भाग कोरडे पडले आहेत. कालवा सल्लागार समितीच्या कागदोपत्री नियोजनात आणि प्रत्यक्षात मोठी दरी असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावरही टीका केली.

“तालुक्याला टेल टू हेड पाणी मिळालेच पाहिजे. ३७ नंबर चारीपासून ६४ नंबर चारीपर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे,” असे माने म्हणाले. पाणी वाटप समितीत इंदापूरचा हिस्सा निश्चित असतानाही ते पाणी नेमके कुठे गेले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली.

पुणे, इंदापूर, बारामतीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा; 20.62 टीएमसी पाणी उपलब्ध

यावेळी भाजप नेत्यांनी कालवा सल्लागार समितीतील आजी-माजी मंत्र्यांवरही थेट टीका केली. “सत्ता आणि समिती दोन्ही तुमच्या हातात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेमके काय केले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाणी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी भाजपकडून देण्यात आला.

 

Web Title: Bjp pradeep garatkar press conference indapur pravin mane khadakwasla canal water issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • baramati news
  • Pune
  • Water storage

संबंधित बातम्या

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के
1

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?
2

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?

Drug Seizure DRI: पुणे स्थानकावर DRI ची धडक कारवाई! ३.४१ कोटींचे ॲम्फेटामाइन, MDMA जप्त; दिल्लीतील  महिलेला अटक
3

Drug Seizure DRI: पुणे स्थानकावर DRI ची धडक कारवाई! ३.४१ कोटींचे ॲम्फेटामाइन, MDMA जप्त; दिल्लीतील महिलेला अटक

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
4

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.