
Baramati Crime News
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी पार्थ अवथडे तसेच स्वप्नील कांबळे यांना अटक केली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सध्या या तिघांकडे चौकशी सुरू आहे. याप्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात लक्ष्मीकांत महादेव सुर्यवंशी (वय ४२, रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी तक्रार दिली आहे.
राणा सुर्यवंशी हे उद्योजक आहेत. लक्ष्मीकांत सुर्यवंशी हा त्यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करत होता. दरम्यान, (दि. १८) रविवारी बारामती तालुक्यातील गोजुबावी भागात सायंकाळी ते वैयक्तिक कामानिमित्त आले असता स्कूटीवरून आलेल्या अज्ञातांनी शस्त्राने उजव्या हातावर वार केले होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. हल्ल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या.
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु
मात्र, नंतर राणाच्या चालकानेच तक्रारीत राणा हे पूर्वी कार्यरत असलेल्या संस्थेच्या चालकांवर संशय व्यक्त करत तक्रार दिली होती. परंतु, पोलिसांनी हल्ला करणाऱ्या एका अल्पवयीनांसह दोघांना पकडले. तेव्हा प्राथमिक तपासातच हल्ल्याचे हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले. नंतर या दोघांचा करविता, तिसराच असल्याचे समोर आले. शुक्रवारी तिसऱ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतर हा हल्ला पूर्व नियोजित, तसेच स्वत: राणा यांनीच घडवून आणल्याचे समोर आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?
Ans: उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला बारामती येथील जीवघेणा हल्ला त्यांनी स्वत:नेच रचलेला डाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ans: ही सुरक्षा अतिसंवेदनशील व्यक्ती तसेच मंत्र्यांना असते. त्याला एक नियमावली आहे.