Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा

BJP Leaders Meeting on Pune Graduate Constituency Election :पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून, तालुकानिहाय संपर्क यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 07:22 PM
Pune Graduate Constituency

Pune Graduate Constituency

Follow Us
Follow Us:
  • भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
  • पदवीधरसाठी भाजपची तालुकानिहाय यंत्रणा सज्ज
  • जिल्हा मध्यवर्ती बँकेचाही घेतला आढावा
सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज आहे. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात पदवीधर मतदारांचे संपर्क-जाळे अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा, अशी सूचना भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे केली.आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसह सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढवावा, मतदार यादीची पडताळणी करावी आणि प्रत्येक तालुक्यातील पदवीधर मतदारांपर्यंत संघटनात्मक यंत्रणा प्रभावीपणे पोहोचवावी, असे पाटील यांनी सांगितले. पदवीधर मतदारांच्या स्थानिक प्रश्नांची माहिती घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मतदार संपर्काचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. मतदार नोंदणी, मतदार याद्यांची पडताळणी आणि निवडणूक प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना आवश्यक माहिती देण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

याच बैठकीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित तालुका व मतदारसंघनिहाय संघटनात्मक स्थिती, पदाधिकाऱ्यांचा समन्वय आणि पुढील निवडणूक तयारीबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीस माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुरेश गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपचे वरिष्ठ नेते मकरंद देशपांडे, नीता केळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात तालुकानिहाय बैठकांचे आयोजन, मतदार संपर्क आणि संघटनात्मक आढावा यावर भर दिला जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट

Web Title: Bjp sangli pune graduate constituency election preparation chandrakant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • BJP
  • elections
  • graduate
  • sangli news

संबंधित बातम्या

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं
1

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

Rahul Gandhi यांचा फोन टॅप होतोय? फोन टॅपिंगवरून काँग्रेस आक्रमक! नाना पटोलेंचा थेट भाजपवर गंभीर आरोप
2

Rahul Gandhi यांचा फोन टॅप होतोय? फोन टॅपिंगवरून काँग्रेस आक्रमक! नाना पटोलेंचा थेट भाजपवर गंभीर आरोप

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी
3

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान
4

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.