Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपच्या बुडाला आग…; उद्धव ठाकरेंनी भाजपच्या  पुन्हा डिवचलं

आशिष शेलारांसारखे लोक आपल्या मराठीचे मारेकरी आहेत. जो मराठी माणूस आपल्या भाषेसाठी आंदोलन करत आहे, आपल्याच भाषेसाठी आपल्याच लोकांवर आंदोलन करण्याची ज्यांनी वेळ आणली ते भाजपवाले त्यांची तुलना अतिरेक्यांशी करत आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 07, 2025 | 04:04 PM
Uddhav Thackeray News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपच्या बुडाला आग…; उद्धव ठाकरेंनी भाजपच्या  पुन्हा डिवचलं
Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Politics: “आमच्या मेळाव्यामुळे भाजपला मिरच्या लागणारच, आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपच्या बुडाला आग लागली आहे. त्यामुळे त्यांना ती आग दाखवताही येत नाहीये. भाजपने कायम लोकांची घरं फोडून राजकारण केलं आहे.” अशा खणखणीत शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी  तब्बल २० वर्षांंच्या प्रदीर्घ काळानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. राज्य सरकारच्या हिंदी भाषा धोरणाला विरोध करत त्यांनी पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यास तीव्र विरोध केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी  राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर भाजप, शिंदे गटाकडून जोरदार प्रतिसाद उमटला.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंविरोधात भाजप नेत्यांनी टीका करण्यास सुरूवात केली.  भाजप मंत्री आणि नेते आशिष शेलार, भाजप खासदार निशिकांत दुबे  यांनीही टीका केली. भाजपच्या या सर्व टीकांना आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. आशिष शेलारांसह निशिकांत दुबे यांना लकडबग्गा म्हणजेच तरस अशी उपमा देत आमचा आनंद त्यांना पाहावत नाहीये असा टोलाही त्यंनी लगावला.

Gopichand Padalkar: “… ही तर सूर्याजी पिसाळाची औलाद”; गोपीचंद पडळकरांची ‘या’ नेत्यावर जहरी टीका

उद्धव ठाकरे म्हणाले, “असे काही लकडबग्गे आहेत जे आम्ही इथे आनंदात राहत आहोत. त्यांना तो आनंद पाहावत नाहीये. म्हणून ते आमच्यात आग लावण्याची कामे करत आहेत. त्यांना कोणी इथे ओळखतही नाही, त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा. काड्याघालणे हा त्यांचा उद्योग आहत. आमचा  भाषेला विरोध नाही, भाषेच्या सक्तीला विरोध आहे.त्यामुळे तुम्ही भाषिक वाद करू नका, शिवसेना आणि शिवसैनिक  रक्तदान सेवा असो वा अॅम्ब्युलन्स सेवा असो, अशा ठिकाणी जातपात न बघता काम करत आलो आहोत. जे आग आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी त्यांच घर बघाव, त्यांचा पक्ष मेला आहे. तो जिवंत होतोय का ते बघावं.”

आशिष शेलारांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की “आशिष शेलारांसारखे लोक आपल्या मराठीचे मारेकरी आहेत. जो मराठी माणूस आपल्या भाषेसाठी आंदोलन करत आहे, आपल्याच भाषेसाठी आपल्याच लोकांवर आंदोलन करण्याची ज्यांनी वेळ आणली ते भाजपवाले त्यांची तुलना अतिरेक्यांशी करत आहेत. अशा लोकांना मराठी माणसाने ओळखलं पाहिजे. जर पहलगामचा विषय त्यांनीच काढला असेल तर आजपर्यंत पहलगामच्या दहशतवाद्यांना भाजपवाले का शोधू शकले नाहीत. ते कुठे गेले. त्यांना लाज वाटली पाहिजे, एकतर तुम्ही  हिंदुंना वाचवू शकत नाही आणि तुम्ही मराठ्यांवर अन्याय  करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेत आहात. असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रात राज्य कर्ते आहेत, याची लाज वाटली पाहिजे.

Hanumankind करणार रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटामधून डेब्यू, कोण आहे हा प्रसिद्ध रॅपर?

याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याही टीकेला उत्तर दिले. उद्धव टाकरे म्हणाले, “मी त्यांची मानसिकता समजू शकते,  मूळ भाजप हा मेलेला आहे. त्यांची ही जी रूदाली सुरू आहे. रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे. त्यामुळे त्यांच्या मेलेल्या पक्षासाठी त्यांनी जे ऊरबडवे घेतलेत. फक्त आमच्यातले, राष्ट्रवादीतलेच नाही तर संपूर्ण देशभरातून त्यांनी उरबडवे घेतलेत.   शिवसेनेच्या ज्या भाजपसोबत युती होती, तो पण मूळ भाजपच यांनी मारून टाकला आहे. पण आता ऊर बडवायलासुद्धा त्यांची ओरिजनल माणसे राहिली नाहीत. ती माणसेही त्यांनी इतर पक्षातून घेतली आहेत. त्यामुळे फडणवीसांची माणसिकता मी समजू शकतो. त्यामुळ मराठी माणसाच्या आनंदाच्या क्षणाला रूदाली वाटत असेल हे अत्यंत हिणकस आणि विकृत वृत्तीची माणसं आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणी अपशब्द बोलत असेल तर त्यांना ठोकलंच पाहिजे. ”

 

 

Web Title: Bjps fire has subsided because we came together uddhav thackeray again challenges bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • BJP news
  • Pahalgam Terror Attack
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: दिल्ली दरबारी फडणवीसांचे वजन वाढले; केंद्राने दिली मोठी जबाबदारी, आता थेट…
1

Devendra Fadnavis: दिल्ली दरबारी फडणवीसांचे वजन वाढले; केंद्राने दिली मोठी जबाबदारी, आता थेट…

Bihar Elections: यादवच करणार यादवांचा गेम; भाजपने ‘तेजस्वी’विरुद्ध थेट…, राघोपुरमध्ये रंगणार महामुकाबला
2

Bihar Elections: यादवच करणार यादवांचा गेम; भाजपने ‘तेजस्वी’विरुद्ध थेट…, राघोपुरमध्ये रंगणार महामुकाबला

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर
3

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

इचलकरंजी महानगरपालिकेतील समिकरणे बदलणार, भाजपाची ताकद वाढली; ‘या’ बड्या नेत्यांचा प्रवेश
4

इचलकरंजी महानगरपालिकेतील समिकरणे बदलणार, भाजपाची ताकद वाढली; ‘या’ बड्या नेत्यांचा प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.