
BMC Election 2026, BMC Election Result 2026, BMC Election Result 2026 Live Updates,
ही स्थिती महायुतीसाठी आव्हानात्मक ठरू शकते, याचे कारण म्हणजे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांकडे सध्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. याउलट, या प्रवर्गातील नगरसेवक केवळ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहेत. २००४ पासून आरक्षणाचा क्रम योग्यरित्या पाळला गेला नसल्याने ही नवी सोडत महत्त्वाची ठरेल. मात्र, नव्या पद्धतीने सोडत निघूनही जर ‘अनुसूचित जमाती’ची चिठ्ठी निघाली, तर महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. “देवाच्या मनात असेल तर महापौर होईल,” या उद्धव ठाकरेंच्या विधानामागे हेच कायदेशीर गणित होते का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation)
अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO
निवडणुकीवेळी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५३ आणि १२१ हे राखीव ठेवण्यात आले होते. या प्रभागात सर्व पक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाचेच उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमं, ५३ मधून जितेंद्र दळवी विजयी झाले, त्यांनी शिंदे सेनेचे अशोको खांडवे यांचा पराभव केला. तर प्रभाग क्रमांक १२१ मधून ठाकरे गटाच्या प्रियदर्शनी ठाकरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला. (Maharashtra Municipal Corporation Election 2026 )
उद्या (२२ जानेवारी) महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांमधील आरक्षणाची सोडत काढली जाईल त्यामुळे कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार हे निश्चित होणार आहे. नगरविकास विभागाकडून महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयातून काढली जाईल.