Mumbai Mayor BMC Election 2026: मुंबई महापौर पदाबाबत भाजप कोणतीही तडजोड करणार नाही..; दिल्ली हायकमांडकडून फडणवीसांना मेसेज
भाजपची हीच अडचण ओळखून एकनाथ शिंदे यांनी पहिल्या अडीच वर्षांसाठी त्यांच्या शिवसेनेला महापौरपद मिळावे आणि इतर समित्यांमध्येही योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेमुळे भाजप आणि शिंदे सेनेत तणाव वाढतच चालला आहे. पण दुसरीकडे मुंबई महापौर पदाबाबत भाजप कोणताही तडजोड कऱणयास तयार नसल्याचेही दिसत आहे.
अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO
महापौर पदाच्या पेच प्रसंगात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. “मुंबई महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने महापौर पदावरही भाजपचाच हक्क असल्याचे मित्र पक्षांना सांगा,” असा स्पष्ट संदेश दिल्ली हायकमांडकडून आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला अनेक दशकांनंतर मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावर भाजपचाच कसा हक्क आहे. ही भूमिका एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या शिवसेनेतेतील नेत्यांना समजावून सांगा. पण हे करताना कोणतेही मतभेद होणार नाहीत, याचीही काळजी घ्या, असे दिल्लीतील पक्षनेतृत्त्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. (Municipal Election Result 2026)
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणनीतीबाबत भाजप नेतृत्वाकडून महत्त्वाची भूमिका मांडण्यात आली आहे. मुंबईचे महापौरपद भाजपकडेच असावे, अशी भावना हजारो कार्यकर्त्यांची असून या भावनेचा सन्मान व्हायला हवा, असे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेऊन त्यांना ही बाब पटवून देण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील अन्य महत्त्वाची पदे आणि राज्यातील इतर महानगरपालिकांबाबतही दोन्ही मित्रपक्षांशी चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढण्याच्या सूचना भाजपने दिल्या आहेत.






