Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election Result 2026: फूट आणि फटका, तरीही ठाकरेंचा झुंजार लढा; मुंबईतील ६५ जागांचा खरा अर्थ काय?

BMC Election Result 2026 - २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत ठाकरे गटाने काही जागा गमावल्या असल्या, तरी मुंबईच्या मराठी पट्ट्यातील आपला प्रभाव त्यांनी कायम राखला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 17, 2026 | 11:19 AM
BMC Election 2026, BMC Election Result 2026, BMC Election Result 2026 Live Updates,

BMC Election 2026, BMC Election Result 2026, BMC Election Result 2026 Live Updates,

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजप-शिंदे गटाच्या युतीने मुंबई महापालिकेचा गड काबीज केला
  • पण महापालिकेच्या निकालातून उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले
  • मुंबईतील ठाकरे” ब्रँड आजही कायम
BMC Election Results 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काल निकाल जाहीर करण्यात आले. पण संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले. होते. भाजप-शिंदे गटाच्या युतीने गेल्या २५ वर्षांपासून ठाकरेंचा बालेकिल्ला असलेला मुंबई महापालिकेचा गड काबीज केला. या निवडणुकीत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालांमुळे भाजपने ठाकरे गटाला मात दिल्याची चर्चा सुरू झाली. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपला जनाधार टिकवून ठेवण्यात यश मिळवल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Raj Thackeray BMC Election 2026: ‘ही निवडणूक सोपी नव्हती..’; निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टची चर्चा

२०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत ठाकरे गटाने काही जागा गमावल्या असल्या, तरी मुंबईच्या मराठी पट्ट्यातील आपला प्रभाव त्यांनी कायम राखला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळाले होते. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर शिंदे यांचीच शिवसेना ही ‘खरी शिवसेना’ असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, महापालिकेच्या निकालातून उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. (Municipal Election Result 2026)

एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी त्यांच्यासोबत आमदारांसह मुंबईतील शिवसेनेचे जवळपस ६२ आजी माजी नगरसेवकदेखील त्यांच्यासोबत गेले. २०१७ च्या निवडणुकीत ठाकरे गटाने ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचा आकडा निम्मा कमी होईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपची प्रचंड ताकद आणि शिंदे गटाच्या आव्हानामुळे मराठी मतांचे विभाजन होऊनही ठाकरे गटाने ६५ जागांवर विजय मिळवला.

अस्तित्वाची लढाई जर या ६५ जागांमध्ये मनसेच्या ६ जागांची भर घातली, तर हा आकडा ७१ पर्यंत पोहोचतो. २०१७ च्या ८४ जागांच्या तुलनेत ही घट मोठी असली, तरी पक्षातील मोठी फूट आणि सत्तेचा अभाव पाहता हे यश महत्त्वपूर्ण मानले जात आहे. थोडक्यात सांगायचे तर, उद्धव ठाकरेंनी जरी महापालिकेची सत्ता गमावली असली, तरी ६५ जागा जिंकून मुंबईतील आपले राजकीय अस्तित्व आणि “ठाकरे” ब्रँड आजही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ!

मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत शिंदे गटाने शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांना तिकीटे दिली होती. याशिवाय शिंदेंच्या जोडीला भाजपची भली मोठी ताकदही असल्याने शिंदे गटाच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात होता. पण एकनाथ शिंदे यांना भाजपडून मुंबईत ९० जागा देण्यात आल्या होत्या, त्यातीती ४० ते ५० जागा सहज जिंकून येतील असाही विश्वास होती. पण प्रत्यक्षातं मात्र शिंदे गटाला केवळ २८ जागा मिळाल्या आणि शिंदे गट ३ जागेवर फेकला गेला. भाजपची मतेही शिंदेसेनेला मिळाली नाही. तर भाजपलाही २०१७ च्या महापालिका निवडणुीच्या तुलनेत फक्त सहा जागा जास्त मिळाल्या २०१७ मध्ये भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना ८९ जागांवर विजय मिळाला.

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, महायुतीने (भाजप-शिंदे गट) बहुमताचा आकडा पार केला आहे.

पक्ष मिळालेल्या जागा
भारतीय जनता पार्टी (BJP) ८९
शिवसेना (ठाकरे गट) ६५
शिवसेना (एकनाथ शिंदे) २९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २४
एआयएमआयएम (AIMIM) ०८
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ०६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ०३
समाजवादी पार्टी (SP) ०२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ०१
एकूण २२७

Web Title: Bmc election result 2026 division and setback yet thackerays tenacious fight what is the real meaning of the 65 seats in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

Akola Municipal Corporation Election 2026 : अबब ! २४ हजारावर ‘नोटा’ला मतदान…, अकोल्यात कोण होणार नगरसेवक?
1

Akola Municipal Corporation Election 2026 : अबब ! २४ हजारावर ‘नोटा’ला मतदान…, अकोल्यात कोण होणार नगरसेवक?

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी, तब्बल 26 हजार 497 मतांचे विक्रमी मताधिक्य
2

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी, तब्बल 26 हजार 497 मतांचे विक्रमी मताधिक्य

Sanjay Raut on BMC Election 2026: ‘जयचंद’मुळे भाजपचा विजय’; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?
3

Sanjay Raut on BMC Election 2026: ‘जयचंद’मुळे भाजपचा विजय’; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?

भोसरी परिसरात विजयाचा गुलाल; ढोल-ताशांच्या गजरात अन् दुचाकी रॅलीने परिसर दणाणला
4

भोसरी परिसरात विजयाचा गुलाल; ढोल-ताशांच्या गजरात अन् दुचाकी रॅलीने परिसर दणाणला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.